किनवट | (आनंद भालेराव): भारत जोडो युवा अकादमी व राष्ट्र सेवादल शाखा किनवट द्वारा आयोजित विज्ञान साहस व छंद शिबिर 2025 समारोप समारंभ दिनांक 8 जून 2025 रविवार वेळ सायंकाळी ठीक 5 वाजता साने गुरुजी इमर्जन्सी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल एमआयडीसी(MIDC) कोठारी किनवट येथे संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अध्यक्ष श्री मुरलीधर बेलखोडे वर्धा ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ वृक्षमित्र इंदिरा गांधी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्राध्यापक रामप्रसाद तौर किनवट, श्री के मूर्ती पत्रकार व माजी नगराध्यक्ष किनवट, श्री अखिल खान प्रसिद्ध योग गुरु किनवट, श्री सदाशिवराव मकदूम ज्येष्ठ प्रशिक्षक राष्ट्रसेवादल आदी उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी आपण अवश्य येऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा असे अशी विनंती भारत जोडो युवा अकादमी व साने गुरुजी रुग्णालय परिवार किनवट तर्फे करण्यात आली आहे.