*" माझा आनंद.. आनंद हरपला...!! "**माझ्या जिवलग सहकारी मित्रांनो माझा वाढदिवस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २६ वा वर्धापन दिन येत्या १० जून रोजी संपन्न होत आहे.*
*पण यानिमित्ताने खरं सांगतोय या वर्षी माझा वाढदिवस साजरा करावा अशी माझी मुळीच इच्छा नाहीये कारण म्हणजे ज्या आई वडिलांनी जन्म दिला त्यांचे उपकार तर आजन्म सोबत आहेतच पण आई बाबानंतर मी ज्या व्यक्तीवर जीव लावला ते म्हणजे माझे नेते स्व.श्री.प्रदीपजी नाईक साहेब..!!*
*खऱ्या अर्थानी त्यांनी मला राजकारणात आणलं संघटनेची जबाबदारी दिली सोबतच अभिमान वाटावा अशा पद्धतीने किनवट तालुक्यात कमी वयामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून सर्वात जास्त मतांनी निवडून आणलं याचा सार्थ अभिमान वाटतो.*
*एवढा मोठा न्याय देणारे माझे नेते नाईक साहेब आज आपल्यात नाहीत मग आनंद साजरा करणे हे माझ्या ठायी निरर्थकच आहे..!!*
*आज रोजी आपल्या सर्वांचे लाडके तथा लोकप्रीय नेतृत्व दिवंगत माजी आमदार स्व.श्री.प्रदीपजी नाईक साहेब यांच्या जाण्याने माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते पोरके झालेत असे म्हटले तर वावगं ठरणार नाही पण खऱ्या लौकिक अर्थानं किनवट माहूर विधानसभेचा आनंद हरपला.*
*त्यासाठी मी या क्षणी माझा आनंद शोधणार नाही तुम्हा सर्वांचे आशीर्वाद सोबत आहेतच या बद्दल तिळमात्र शंका नाही पण दुःखाचं सावट तुम्ही जाणता आपण सर्व ज्येष्ठ मान्यवर नेतेमंडळी,मार्गदर्शन करणारी वडीलधारी मंडळी ,तरुण जिवलग सहकारी मित्र मंडळी आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा सोबत होत्या,आहेत आणि त्या यापुढे सुद्धा सोबत असतीलच याची मला खात्री आहे.*
*पण मी प्रामाणिकपने नमूद करू इच्छितो की या वर्षी मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही.*
आपला ऋणाईत
*बालाजी बामणे मालकवाडीकर*
राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक किनवट