Ticker

6/recent/ticker-posts

लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे नांदेड जिल्हा जयंती मंडळ अध्यक्षपदी - नागेश तादलापूरकर


नांदेड:  साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे 105 व्या जयंती महोत्सव निमित्ताने सार्वजनिक जिल्हा जयंती मंडळ व कार्यकारिणीची बैठक दि. 4 जुलै रोजी सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रीय संविधान बचाव अभियान चे अध्यक्ष प्रा. देविदास इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली व  संयोजक गणेशअण्णा तादलापूरकर यांच्या प्रमुख उपस्तितीत जिल्हा जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी- अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचे जिल्हाप्रमुख नागेश तादलापूरकर निवड करण्यात आली .

 


तसेच  उपाध्यक्षपदी- अंबादास भंडारे मिनकीकर,उपाध्यक्षपदी-राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष मारोती चिवळीकर,उपाध्यक्षपदी-डीपीआय चे  जिल्हाध्यक्ष रोहन वाघमारे, भगवान जाधव,मंगलसांवी ता. कंधारचे ग्रामपंचायत सदस्य सचिन कपाळे तर सचिवपदी- शिवसेनेचे उपशहर प्रमुख ईश्वर अण्णा जाधव, सहसचिवपदी- भाजपचे कार्यकर्ते पदी बंटी बारडकर, प्रा. मंगेश देवकांबळे गऊळकर, बंटी दुधकवडे आणि कोषध्यक्ष पदी संतोष शिंदे यांची सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी एकमताने निवड केली. यावेळी  माजी जयंती मंडळाचे अध्यक्ष कॉ. गंगाधर गायकवाड, सूर्यकात तादलापूरकर,संजय गायकवाड,निलेश तादलापूरकर, सोनू वाघमारे,नागोराव आंबटवार, डॉ. मिलिंद शिकारे, साईनाथ जाधव, राहुल तेलंग, बाळू लोंढे,आकाश गवाले, इरवंत सूर्यकर,विलास जाधव, सचिन वाघमारे, उत्कर्ष भोसीकर, सचिन आंबटवार , प्रथमेश तादलापूरकर, अंकुश कांबले, माधव भुयारे, कृष्णा कंटेवार,ऋषिकेश तादलापूरकर, माणिक टोकलवाड, बजरंग पांडेवाद, विशाल रणदिवे, अजय शिंदे  यांच्यासह शेकडो समाजबांधव उपस्तितीत होते.
.

Breaking News

आदिलाबाद परळी रेल्वे  मधून अवैधरित्या सागी माल वाहतूक करताना तपासणी अंती जप्त