किनवट : आगामी जिल्हा परिषदेसह किनवट नगरपरिषद आणि विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार भीमराव केराम तसेच नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट शहर मंडळ कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
भाजपा तालुका शहराध्यक्ष स्वागत आयनेनिवार यांनी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र बहाल केल्याचे प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
कृष्णा रामराव इटकेपल्लीवार युवा मोर्चा अध्यक्ष, जगदीश भगवानराव नेमानिवार किसान मोर्चा अध्यक्ष, पूनम लखन दीक्षित महिला मोर्चा अध्यक्ष, ओबीसी अध्यक्ष शिवाभाऊ क्यातमवार, एस सी अध्यक्ष शंकर भंडारे, एस टी मोर्चा अध्यक्ष संतोष कनाके, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष अरबाज खान हशम खान, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष जयराज शर्मा, नरसिंग आनंदराव तकलवार, उपाध्यक्ष राजेंद्र लक्ष्मण भातनासे, उपाध्यक्ष आकाश भंडारे, राहुल कृष्ण गारगुलवार ,उपाध्यक्ष धीरज भगवान नेमानिवार, सरचिटणीस बाळकृष्ण देवराव कदम, सरचिटणीस सुनील मच्छेवार, कृष्णा कलकुंटवार चिटणीस, शिवाजी आंधळे चिटणीस, कृष्णा बासटवार गणेश रामराव कोल्हे विद्याताई पाटील गंगुताई परेकार, चिटणीस, कोषाध्यक्ष सतीश बिराजदार यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे भाजपा तालुका शहराध्यक्ष स्वागत आयनेनिवार यांच्याकडून कळविण्यात आले आहे