Ticker

6/recent/ticker-posts

अवैधरित्या देशी दारू विक्री करताना रंगेहात पकडले ऑपरेशन फ्लॅश आउटच्या अंमलबजावणीची दहशत दारू विक्री करताना आरोपीस रंगेहात केली अटक

 


श्रीक्षेत्र माहूर

पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशाने नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या ऑपरेशन फ्लॅश आउट अंतर्गत पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी माहूर तालुक्यातील मौजे रूई येथे देशी दारू च्या बाटल्या अवैधरित्या विक्री करत असलेल्या आरोपीस रंगेहात पकडून अटक केल्याची घटना दि 5 रोजी सकाळी 10 वाजता घडली आहे


पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी आपरेशन फ्लॅश आऊट ची अंमलबजावणी दणक्यात सुरू केल्याने गेल्या आठवड्याभरात अनेक गुन्हे दाखल झाले असून आरोपीना रंगेहाथ पकडून न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे तर लाखो रुपयांचा मुद्देमाल ही जप्त करण्यात आलेला आहे मौजे रुई येथे दि 4 रोजी पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी शांतता बैठक घेऊन नागरिकांना अवैध धंदे करू नका व्यसनापासून दूर राहा असे सविस्तर मार्गदर्शन केले होते परंतु दुसऱ्याच दिवशी येथील संजू लोट नावाच्या व्यक्तीने देशी दारूचे 42 बॉटल घेऊन विक्री करत असताना त्यास रंगे हात पकडले 


अवैध व्यवसाय करणाऱ्या नागरिकांनी आपले अवैध व्यवसाय तत्काळ बंद करून वाईट व्यसनाच्या आहारी गेल्याने नागरिकात होणारे तंटे वाढवू नयेत तालुक्यातील कुठल्याही गावातील एकही महिला नवऱ्याने दारू पिऊन मारले अशी तक्रार घेऊन आल्यास किंवा अवैधरित्या दारू विक्री होत असल्याची तक्रार आल्यास त्यांना सुंदरीचा महाप्रसाद भेटेल आणि कडक कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा यावेळी पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी दिला आहे  या कारवाईत पोहे का आशिष डगवाल पोहेका चालक प्रशांत भोपळे पो का ज्ञानेश्वर खंदाडे पो का पवन राऊत शिल्पा राठोड क्रांती राठोड गजानन जाधव होमगार्ड सलमान मजीद खान यांनी परिश्रम घेतले

Breaking News

आदिलाबाद परळी रेल्वे  मधून अवैधरित्या सागी माल वाहतूक करताना तपासणी अंती जप्त