Ticker

6/recent/ticker-posts

साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जिल्हास्तरीय जयंतीनिमित्त दि.04 जुलै रोजी महत्वपूर्ण बैठक…

 



सकल मातंग समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

नांदेड- साहित्य, समाजसुधारणा व श्रमिकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे थोर लोकसाहित्याचे सम्राट आणि सामाजिक समतेचे प्रतीक असलेले साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जिल्हास्तरीय सार्वजनिक जयंती उत्सवाच्या तयारीसाठी एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक 4 जुलै रोजी, साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे चौक (परिसर) MSEB वर्कर्स  फेडरेशन कार्यालय, नांदेड. दुपारी १२ वाजता होणार आहे.

 या बैठकीत यंदाच्या जयंती उत्सवाच्या आयोजनासाठी जिल्हास्तरीय सार्वजनिक जयंती उत्सव समिती गठित केली जाणार आहे. सदर बैठकीस समस्त सकल मातंग समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले असून जयंती उत्सव अधिक व्यापक, भव्य आणि सुसंगठित करण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक असल्याचे सकल मातंग समाज समन्वयक तथा संयोजक गणेश अण्णा तादलापूरकर, ईश्वर अण्णा जाधव,कॉ. गंगाधर  गायकवाड, सूर्यकांत  तादलापूरकर, नागेश तादलापूरकर, भालचंद्र  पवळे, माधव  डोमपल्ले, नागोराव  आंबटवार, मारोती  चिवळीकर, बाळू  खोबरे, संजय  गायकवाड, बाळू लोंढे, सचिन  वाघमारे, भगवान  जाधव, माधव  गोरकवाड, शिवाजी  नुरुंदे , शशिकांत  तादलापूरकर, संजय  गोटमुखे, संतोष  शिंदे, दयानंद  बसवंते, बालाजी  पानसरे, रोहन वाघमारे, गणेश  दाडे, गणेश  मोरे, आकाश  गवाले, सोनू  वाघमारे, यांनी सांगितले आहे.

Breaking News

आदिलाबाद परळी रेल्वे  मधून अवैधरित्या सागी माल वाहतूक करताना तपासणी अंती जप्त