मांडवी: ता. किनवट, जिल्हा नांदेड येथील इंदिराबाई राठोड ट्रस्टच्यावतीने माजी मंत्री उत्तमराव राठोड यांच्या स्मृती प्रीत्यर्थ जीवन कार्यावर आधारित ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे. आज छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष समाजभूषण प्राचार्य राजाराम राठोड आणि प्राचार्य व्ही. एस. पवार यांची ग्रंथ निर्मिती टीमने सदिच्छा भेट घेऊन सविस्तर माहिती दिली. सदरील टीम विविध मान्यवरांची भेट घेत आहे.
संस्थेचे अध्यक्ष श्री गंगन्ना नेम्मानीवार, सचिव नितीन राठोड (मांडवी), सामाजिक कार्यकर्ते श्री धरमसिंग राठोड पालाईगुडा, साहित्यिक कल्लोळकार डॉ. वसंत राठोड (मांडवी) आदि मान्यवर या टीममध्ये आहेत.
याप्रसंगी वनाशिप्रचे सचिव नितीन राठोड, फुलसिंग जाधव, सौ. सतलजबाई पवार, श्री निळू जाधव, जयवंत आडे आदि उपस्थित होते.
*विशेष सूचना : ज्या मान्यवरांना दिवंगत नेते उत्तमराव राठोड भाऊच्या जीवन कार्य किंवा आठवणी संदर्भात लेख पाठवायचे असेल त्यांनी साहित्यिक डॉ. वसंत राठोड (मांडवी) यांच्याशी 9420315409 या नंबरवर संपर्क साधावा.*