Ktnnewslive:गोकुंदा शहरातील दत्तनगर येथे राहणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश बोनतावार यांचे बंधू जिल्हा परिषद शाळा धामधरी येथे कार्यरत असलेले मुख्याध्यापक श्री दिनेश बोनतावर यांचे दिनांक 15 मे रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.
गुरुवारी त्यांचा अंत्यसंस्कार स्मशान भूमीत करण्यात आला. त्यांच्या पाश्चात दोन मुले, पत्नी, वडील भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अशा अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अंतयात्रेला बहुसंख्या नागरिक उपस्थित होते.