Ticker

6/recent/ticker-posts

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल गरळ ओकनाऱ्याची सरकारने याची गंभीर दखल घ्यावी, त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्याच्या मुसक्या आवळाव्यात-राजहंस



मुंबई: नाशिकमधला कोणीतरी बाळा दराडे नावाचा फडतूस कार्यकर्ता काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार Rahul Gandhi जी यांच्याबद्दल गरळ ओकण्याचे काम करतो. ज्या कुटुंबाने देशासाठी सर्वस्व अर्पण केले त्या कुटुंबापैकी एक असलेले राहुल गांधी जी यांच्या तोंडाला काळ फासण्याची भाषा करतो, त्यांच्यावर दगडफेक करण्याची धमकी देतो याचा काँग्रेस पक्ष निषेध करते. सरकारला मागणी करतो की सरकारने याची गंभीर दखल घ्यावी, त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्याच्या मुसक्या आवळाव्यात. 


यापूर्वीसुद्धा महायुतील आमदार संजय गायकवाड, खासदार अनिल बोंडे, नितेश राणे, शरद पोंक्षे, रावसाहेब दानवे यांच्या सारख्या अनेकांनी राहुल गांधी यांच्याबद्दल गरळ ओकल्याचे, बेताल वक्तव्य केलेले आपण पाहिलं आहे पण सरकारने यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब...आपण अशा व्यक्तींना कितीदिवस पाठीशी घालणार आहात?  ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही.


राहुल गांधी मोदी, शाह यांना घाबरत नाहीत. बाळा दराडे सारख्या पडतूसाच्या धमक्यांना ते थोडेच घाबरणार आहेत. आमच्यासारखे महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यवधी काँग्रेस कार्यकर्ते ढाल बनून त्यांचे संरक्षण करायला सज्ज आहेत. त्यांच्या केसाला धक्का लावायचा प्रयत्न सोडा विचारही करू नका. आम्हाला आमची संस्कृती सोडायची नाही पण आमच्या नेत्यांबद्दल खालच्या पातळीवर येऊन टीका केली तर ते सहन केले जाणार नाही.

Breaking News

आदिलाबाद परळी रेल्वे  मधून अवैधरित्या सागी माल वाहतूक करताना तपासणी अंती जप्त