Ticker

6/recent/ticker-posts

कॉम्रेड गंगाधर गायकवाड यांची उप संपादक पदी निवड - संपादक शंकरसिंह ठाकुर


नांदेड : चळवळीतील आणि सामाजिक कार्यकर्ते तथा राजकीय विश्लेषक कॉ.गंगाधर गायकवाड यांची दैनिक वीर शिरोमणी च्या उप संपादक पदी निवड करण्यात आल्याचे अधिकार व नियुक्तीपत्र संपादक शंकरसिंह ठाकूर यांनी दि. १२ जून रोजी प्रदान केले आहे.

कॉ.गंगाधर गायकवाड यांचे कार्य उल्लेखनीय असून त्यांनी मागील तीस वर्षात अनेक वृतपत्रासाठी कार्यकारी संपादक, वृत्त संपादक पदी काम केले आहे.

त्यांनी सीटू कामगार संघटनेच्या माध्यमातून शकडो कामगार कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला असून त्यांना अनेक संस्थानी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

त्यांनी आपल्या लेखणीतून सातत्याने गरीब व गरजू लोकांना न्याय मिळावा म्हणून लेखन केले आहे. राज्य व केंद्रातील राजकीय परिस्थिती व भौगोलिक तथा ऐतिहासिक जाण असलेले नेतृत्व म्हणून त्यांना जाणीव असल्यामुळे 

त्यांच्या कार्याची व लिखाणाची नोंद घेत त्याच्यावर आपल्या दैनिकांची उप संपादक पदाची जबाबदारी देत असल्याचे संपादक ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले आहे.

यापूर्वी त्यांनी साप्ताहिक माहूर किल्ले गड येथे कार्यकारी संपादक व साप्ताहिक नंद गिरीचा कानोसा येथे वृत्त संपादक म्हणून चांगले काम केले आहे.

कॉ.गंगाधर गायकवाड यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या असून यावेळी नंद गिरीचा कानोसाचे संपादक श्री मारोती शिकारे व कॉ. अजिजूर रहेमान यांची उपस्थिती होती.

कॉ.गायकवाड यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अशी माहिती संपादक श्री शंकरसिंह ठाकूर यांनी दिली आहे.

Breaking News

आदिलाबाद परळी रेल्वे  मधून अवैधरित्या सागी माल वाहतूक करताना तपासणी अंती जप्त