Ticker

6/recent/ticker-posts

हुतात्मा जयंतराव पाटील विद्यालय कनकी येथे स्व. के. माधव रेड्डी यांच्या पुण्यस्मरण निमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न

 




मांडवी: हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालय कणकी येथे शाळेचे  अध्यक्ष तसेच कनकी गावचे माजी सरपंच,  कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती के. माधवराव रेड्डी यांच्या14 व्या पुण्यस्मरणा निमित्य अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.

    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री डी. एस. शेंडे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सर्वेसर्वा माननीय के. सूर्यकांत रेड्डी, सचिव मा के.प्रशांत रेड्डी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ज्येष्ठ कार्यकर्ते मा. ईश्वर चव्हाण, पालक कृष्णा मोहुर्ले हे होते. 

  प्रथमतः के. माधव रेड्डी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्वांनी अभिवादन करून आदरांजली वाहिली. तदनंतर शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी स्व.के. माधव रेड्डी यांच्या चरित्र विषयक आपले मनोगत व्यक्त केले.



 वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप मान्यवराच्या हस्ते संपन्न झाले. त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मा. ईश्वर चव्हाण, मु.अ.डी एस शेंडे,आनंद भालेराव, भगवान बोनतावार यांचे मार्गदर्शनपर भाषणे झाली.




  याप्रसंगी बोलताना ईश्वर चव्हाण म्हणाले की, के. माधव रेड्डी वीस वर्ष कनकी गावचे सरपंच,किनवट ता.काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष,किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व इतर अनेक समित्यावर सदस्य असलेले मित भाषिक व सर्वांना हवे हवेसे वाटणारे या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सर्वात जास्त सुखदुखात कामे पडणारे के. माधव रेडी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले  त्यांच्या निधनानंतरही हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालय, त्यांचे सुपुत्र के. सूर्यकांत रेड्डी व प्रशांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीत चालू असून या संस्थेत गोर गरीब विद्यार्थी सर्व स्तरातून शिक्षण घेत आहे. वडिलांचा वारसा ते पुढे नेत आहेत त्याबद्दल त्यांचे मनापासून करावे तेवढे कौतुक कमीच आहे असे त्यांनी सांगितले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद भालेराव यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमारी दिव्या बावणे मॅडम यांनी केले कार्यकर्त्याची सांगता राष्ट्रगीताने झाली. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सुरुची भोजन देण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र ठाकरे विष्णू मडावी, पोचिराम मोहूर्ले, रामराव राठोड, नरसिंग खांडरे,आदींनी परिश्रम घेतले. 

Breaking News

आदिलाबाद परळी रेल्वे  मधून अवैधरित्या सागी माल वाहतूक करताना तपासणी अंती जप्त