Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षकांसाठीची वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी ऑफलाईन प्रशिक्षण किनवट येथे घेण्याची मागणी



Ktnnewslive:शिक्षणासाठी ची वरिष्ठ वेतनश्रेणी वर निवड वेतनश्रेणीचे ऑफलाईन प्रशिक्षण नांदेड या जिल्ह्याच्या ठिकाणी न घेता किनवट तालुक्याच्या ठिकाणी  घेण्यात यावी अशी मागणी शिक्षक वृंदाकडुन समोर येत आहे.
 किनवट माहूर हे तालुके आदिवासी, अतिदुर्ग, नक्षलग्रस्त, अवघड क्षेत्र म्हणून शासन दरबारी नोंद आहेत. हा भाग नांदेड जिल्हा पासून एकशे पन्नास (150) किलोमीटर दूर आहे . सध्या या भागातील कर्मचाऱ्यांना  जिल्ह्याच्या ठिकाणी ये- जा करण्यासाठी अनेक अडचणींचा सामोरे जावे लागत आहे. तसेच उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने शिक्षक कर्मचारी देवदर्शनासाठी प्रयागराज, अयोध्या, काशी, केदारनाथ, जगन्नाथ अशा धामांना कुटुंबासह गेलेले आहेत. त्यामुळे वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी  प्रशिक्षणाची सुरुवात 7 किंवा 8 जून पासून करण्यात यावी व सदरील निवड श्रेणीचे ऑफलाईन  प्रशिक्षण नांदेड ला न घेता 150 कि.मी दुर असलेल्या  किनवट तालुक्याच्या ठिकाणी घेण्यात यावी  अशी मागणी शिक्षक कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
 

Breaking News

कॉम्रेड यादवराव गायकवाड यांना स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन!*