Ticker

6/recent/ticker-posts

गस्तीवर असलेल्या तलाठ्यांची अर्ध्या रात्री धडक कार्यवाही वाळू चोरी करून नेणारा ट्रॅक्टर पकडला वाळू घाटावर गस्त करण्यासाठी दोन वाहना सह अग्नी शस्त्रांची नितांत गरज पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त


श्रीक्षेत्र माहूर 

माहूर तालुक्यातील मौजे साकुर कुपटी रस्त्यावरील नाल्यातून अर्ध्या रात्री विना नंबरच्या फार्मट्रेक कंपनीच्या ट्रॅक्टर मध्ये अवैध रित्या वाळू भरून विक्रीसाठी नेत असलेला ट्रॅक्टर महसूलच्या पथकातील तलाठ्यांनी पकडून माहूरच्या तहसील कार्यालयात पाच लाखाचा मुद्देमाल जमा केल्याची घटना दि 15 रोजी रात्री 11 वाजता घडली आहे


जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तूंला तसेच माहूरचे तहसीलदार अभिजीत जगताप नायब तहसीलदार कैलास जेठे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात ठीक ठिकाणी नदीपात्रावर तसेच नाल्यावर वाळू चोरी होऊ नये म्हणून बैठे आणि फिरत्या पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे

तालुक्यात अनेक ठिकाणी पैनगंगा नदी पात्रावर बैठ्या पथकांची नेमणूक झाल्याने अनेक वाळू तस्कर नाल्यावरून वाळू चोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत असल्याने याआधी अनेक ठिकाणी ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहेत तर दि 15 रोजी रात्री तहसीलदार अभिजीत जगताप नायब तहसीलदार कैलास जेठे यांच्या मार्गदर्शनाखाली फिरत्या पथकात गस्तीवर असलेले ग्राम महसूल अधिकारी पवन यादव मनोहर चेके सुनील वनवे ओमप्रकाश तवर कोतवाल बंडू चिरंगे विलास शेळके संदीप रणमले हे कुपटी ते साकुर रस्त्यावर गस्त घालत असताना नाल्यातून वाळू भरून बाहेर आलेला विना नंबरचा  फार्मट्रेक कंपनीचा ट्रॅक्टर दिसल्याने त्यास अडवून पाहणी केली असता त्यामध्ये विनापरवानगी वाळू  भरून वाहतूक करत असलेला आढळून आल्याने त्यास तत्काळ पकडून माहूरच्या तहसील कार्यालयात आणून पाच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन त्यावर महसूल सहाय्यक वैभव घोडे यांनी तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेशीर कारवाईसाठी प्रस्ताव पाठविला आहे


माहूर तालुक्यातील पाचही वाळू घाटांची वाळू लिलाव प्रक्रिया रखडल्याने तालुक्यात  वाळूच्या मागणीत प्रचंड वाढ झालेली असल्याने वाळू तस्कर मोठ्या हिमतीने नाल्यातून वाळू काढत दहा हजार रुपये बरासने विक्री करण्याचा प्रयत्न करत असल्याने तहसीलदार अभिजीत जगताप यांनी नदीपात्रासह तालुक्यातील प्रत्येक रस्त्यावर गस्त वाढविली असून गस्तीसाठी आणखी दोन वाहनाची नितांत गरज असल्याने अनेक ठिकाणी विदर्भातील मुजोर वाळू तस्कर सोबत अग्निशस्त्र ठेवत असल्याने पथकातील कर्मचाऱ्यांना तात्काळ नवीन दोन वाहनासह अग्नि शस्त्र द्यावे अशी मागणी जोर धरत असून एखादेवेळी अनुचित प्रकार घडून जीव जाण्याची शक्यता नाकारता येत असल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी माहूर पैनगंगा नदी पात्रावरील वाळू घाट तात्काळ लिलाव करावे अशी मागणी होत आहे

Breaking News

संभाजी ब्रिगेडच्या विधानसभा अध्यक्षपदी पांडुरंग बादड संघटक पदी विक्रम पवार प्रसिद्धी प्रमुखपदी आकाश इंगोले यांची निवड