किनवट प्रतिनिधी :-
मागील आठ वर्षानंतर दि.02/12/2025 किनवट नगर परिषदची निवडणूक झाली.या निवडणूकांमध्ये सर्वच पक्षांनी आपापल्या स्तरावर निवडणूक जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण या निवडणूक मध्ये फक्त 1 नगराध्यक्ष आणि 21 नगरसेवक निवडून येणार आहे.निवडून येणारे उमेदवार कोणत्याही पक्षाचे असू शकतात.निवडणूक मध्ये विजय,पराभव लागलेली असतात.निकाल काही ही आला तर सर्वांनी त्याला स्वीकार करावे व शहराच्या विकासासाठी प्रयत्न करावे.विजय व पराभव झालेल्या उमेदवार किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणावर ही आरोप करू नये.निवडणूक प्रक्रिया शांत पार पाडण्यासाठी जनतेने प्रशासनाला खूप सहकार्य केले आहे.
हि निवडणूक व्यवस्थित पणे पार पाडण्यामध्ये या तालुक्याचे आमदार, तहसीलदार,मुख्यधिकारी नगरपरिषद किनवट,पोलीस प्रशासन,सर्व पत्रकार बांधव,गावातील ज्येष्ठ नागरिक व इतर लोकांनी योगदान दिले म्हणून हे निवडणूक शांततेत झाले.शांततेत झालेल्या निवडणूक प्रमाणे मतमोजणी प्रक्रिया ही शांततेत व्हावी या साठी सर्वांनी प्रयत्न करावे.
येणाऱ्या 21 डिसेंबर 2025 ला निकालाचा दिवस असणार आहे. निकाल काही आला तरी आपण सर्वांनी संयम राखावे व संपूर्ण किनवट शहरात व तालुक्यात शांतता राखावे ही विनंती.असे आवाहन किनवट चे माजी नगराध्यक्ष इसा खान सरदार खान यांनी सर्व उमेदवार व जनतेशी केले आहे.
