किनवट प्रतिनिधी
राज्य शासनाने घोषित केलेल्या निशुल्क वाळू वितरणाची किनवट तालुक्यात जलदगतीने अंमलबजावणी सुरु झाली असून 27 जून रोजी उपविभागीय अधिकारी जेनीथ चंद्र दोंतूला यांच्या मार्गदर्शनाखाली किनवटच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार डॉ शारदा चौंडेकर यांनी किनवट तालुक्यातील मौजे आंदबोरी सज्जा अंतर्गत असलेल्या पोत्तारेडी येथील घरकुल लाभार्थ्यांना बैठक घेऊन वाळू वितरित केली आहे.बांधकामासाठी वाळू उपलब्ध झाल्याने लाभार्थ्यातून आनंद व्यक्त केला जात आहे
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी मोफत 5 ब्रास रेती उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती.या घोषणेची किनवट तालुक्यात जलदगतीने अंमलबजावणी सुरू झाली असून 27 मे 2025 रोजी उपविभागीय अधिकारी जेनीथ चंद्र दोंतूला यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार डॉ. शारदा चोंडेकर यांनी किनवट तालुक्यातील अंदबोरी सज्जा अंतर्गत असलेल्या पोतारेडी या गावातील घरकुल लाभार्थ्यांना बैठक घेऊन निशुल्क वाळू वितरनाचा शुभारंभ केला आहे. याप्रसंगी मंडळ अधिकारी श्री गाडे, ग्राम महसूल अधिकारी अनुसया ईप्पलवाड, ग्राम महसूल अधिकारी श्री यादव,सरपंच,उपसरपंच,ग्रामविकस अधिकारी खिल्लारे,पोलीस पाटील विनायक तलाठा,महसूल कोतवाल अयोध्या जटाळे यांच्यासह घरकुल योजनेचे लाभार्थी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्य शासनाच्या निशुल्क वाळू वितरणाचा पोत्तारेड्डी गावापासून सुभारंभ होत आहे.पंतप्रधान घरकुल आवास योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या हेतूने शासनाने मोफत वाळू वितरनाचे धोरण अवलंबविले आहे.उपविभागीय अधिकारी जेनिथ चंद्रा दोंतूला यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून दिली जाईल. वाळू अभावी घरकुलांची कामे रखडणार नाहीत याबाबत तहसील कार्यालय दक्ष असून लाभार्थ्यांनी वाळू उपलब्ध होतात घरकुलाचे बांधकाम पूर्ण करून घ्यावे.
डॉ. शारदा चौंडेकर
तहसीलदार किनवट