नांदेड: मौ.वसूर ता.मुखेड येथील मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी व जागा उपलब्ध करून देणे बाबत जिल्हा स्तरावरून सकारात्मक असे प्रशासकीय पातळीवर सहकार्य करणारे निवासी उपजिल्हाधिकारी श्री महेश वडदकर साहेब यांना आज अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व मास संघटनेच्या वतीने भेटून सत्कार करित आभार व्यक्त करण्यात आले व मौ.वसूर येथील मागासवर्गीय समाजास ७/१२ नोंदीनुसार स्मशानभूमीची जागा उपलब्ध झाली आहे परंतु स्मशानभूमीच्या जागे पर्यंत पोहचण्यासाठी रस्ता नाही म्हणून रस्त्यासाठी जागा उपलब्ध करून देणे बाबत जिल्हास्तरावरून पुढे ही आवश्यक ती प्रशासकीय मदत करावी,अशी विनंती ही या प्रसंगी एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनाचे संस्थापक -अध्यक्ष सतिश कावडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ.गंगाधर गायकवाड,मास संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुर्यकांत तादलापुरकर, निलेश तादलापुरकर, अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनाचे राज्य महासचिव शिवाजीराव नुरूंदे, जिल्हा प्रमुख नागेश भाऊ तादलापुरकर, आनंद वंजारे, गोपिनाथ सुर्यवंशी, उत्तमराव वाघमारे, .उपस्थित होते