Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्याचा चोरीस गेलेला ट्रॅक्टर व पेरणी यंत्र अवघ्या १२ तासांत जप्त सिंदखेड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी


माहूर : माहूर तालुक्यातील वडसा येथील शेतकरी शंकर दत्तात्रय चारोडे यांच्या शेतीकामासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर व पेरणी यंत्राची चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध सिंदखेड पोलिसांनी अवघ्या १२ तासांत लावत यवतमाळ येथून मुद्देमाल जप्त केला. या धडाकेबाज कारवाईमुळे सिंदखेड पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.


वडसा येथील शेतकरी शंकर दत्तात्रय चारोडे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्यानुसार, त्यांच्या मालकीचा सोनालिका छत्रपती कंपनीचा ट्रॅक्टर व पेरणी यंत्र दिनांक १४ रोजी रात्री चोरीस गेले होते. अल्पावधीत चोरीचा छडा लावणे व मुद्देमाल जप्त करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.


जिल्हा पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदखेड पोलीस ठाण्याचे ठाणेदार रमेश जाधवर, तपास अधिकारी डी. जी. चव्हाण, जमादार संजय शेंडे व संदीप वानखेडे यांनी तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली.


या कारवाईत तब्बल ७ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल यवतमाळ येथून जप्त करण्यात आला असून आरोपी पीयूष दिलीप मुंनगीलवार, रोहित पावडे व शेख सलमान शेख माजीद (तिघेही राहणार वडसा, ता. माहूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या चोरीप्रकरणात निष्पन्न झालेल्या आरोपींची नावे समोर येताच वडसा गावासह माहूर परिसरात खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांमध्ये सिंदखेड पोलिसांच्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

Breaking News

संभाजी ब्रिगेडच्या विधानसभा अध्यक्षपदी पांडुरंग बादड संघटक पदी विक्रम पवार प्रसिद्धी प्रमुखपदी आकाश इंगोले यांची निवड