किनवट (आनंद भालेराव ) : आज किनवट येथील पोलीस स्टेशनचे दबंग पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी गोकुंदा येथील ठाकरे चौकात भेट देऊन ठाकरे चौकामध्ये कॉलेज, महाविद्यालय, शाळा तसेच पोलीस प्रशिक्षणार्थ अकॅडमी येथील मुला/ मुलीं, विद्यार्थ्यांना भेटून सविस्तर मार्गदर्शन करत कडक शब्दात ताकीद केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे, कोणीही उनाडपणा करताना दिसून आल्यास किंवा वाद घालत असल्यास, छेडछाड करत असल्यास तात्काळ पोस्टे चे अधिकारी बिट अंमलदार यांचे मोबाईल नंबर वर किंवा डायल 112 वर कॉल करण्यास सूचना दिल्या आहेत. तसेच कोणीही वाहने जोरात चालवणार नाही , कोणीही स्टंट करणार नाही .याबाबत योग्य सूचना दिल्या.
