किनवट : किनवट नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या अनुषंगाने रविवारी (ता. २१ डिसेंबर २०२५ ) मतमोजणीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे किनवटचा आठवडी बाजार रविवार ऐवजी सोमवारी (ता.२२ डिसेंबर २०२५) भरणार आहे ; याची नोंद शहरातील व आसपासच्या सर्व गावातील जनतेंनी घ्यावी असे जाहीर आवाहन नगर परिषदेचे मुख्यधिकारी विवेक कांदे यांनी केले आहे.
किनवट नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी ता. २ डिसेंबर रोजी मतदान झाले होते . त्याची मतमोजणी रविवारी (ता.२१ डिसेंबर २०२५ ) आहे. त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांचे आदेश क्र.२०२५/आरबी-१/डेस्क-२/टे-४/न.प. व न.पं./नि/प्र.क्र.७९/ दि. ११ डिसेंबर, २०२५ या अन्वये किनवट शहरातील दि.२१/१२/२०२५ (रविवार) रोजी भरविण्यात येणारा आठवडी बाजार हा रद्द करुन सदर आठवडी बाजार हा सोमवारी (ता. २२/१२/२०२५ ) भरविण्यात येणार आहे.
तरी, किनवट शहरातील व आसपासच्या गावातील सर्व जनतेनी व व्यापा-यांनी याची नोंद घ्यावी. असे आवाहन मुख्याधिकारी श्री कांदे यांनी केले आहे.
