Ticker

6/recent/ticker-posts

मतमोजणी दरम्यान अज्ञात हॅकर्स इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर परिणाम करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 मतमोजणी स्थळापासून ते 100 मीटर परिसरात मोबाईल जामर  लावून  प्रतिबंधित करण्याची मागणी 


किनवट/प्रतिनिधी: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने नगरपरिषद किनवट सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने दिनांक 21/ 12/ 2025 रोजी मतमोजणी संपन्न होणार आहे.

      त्यानिमित्ताने मतमोजणी स्थळापासून ते 100 मीटर अंतराचा परिसर मोबाईल जामर लावून प्रतिबंधित करावे. अशी मागणी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पार्टी किनवटच्या वतीने तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे.

निवेदनात नमूद केले आहे की, नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 रोजी मतदान संपन्न झाले मतदान प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे सीलबंद करून नगरपरिषद कार्यालयातील स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आले.

 दिनांक 21/ 12/ 2025 रोजी निकाल जाहीर केला जाणार असून त्या अनुषंगाने मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच 21 /12/ 2025 रोजी मतमोजणी दरम्यान अज्ञात हॅकर्स इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर परिणाम करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

   करिता खबरदारी म्हणून दिनांक 21/ 12/ 2025 रोजी सकाळी 9 ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून मतमोजणी स्थळापासून ते 100 मीटर परिसरात मोबाईल जामर बसून प्रतिबंधित करण्याची कारवाई करावी असे म्हटले आहे.

या निवेदनावर महाराष्ट्र प्रदेश सचिव परवीन शेख शहराध्यक्ष गिरीश नेमानिवार, वसंत राठोड व इतर नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी चे उमेदवार यांच्या स्वाक्षरी आहेत.

Breaking News

संभाजी ब्रिगेडच्या विधानसभा अध्यक्षपदी पांडुरंग बादड संघटक पदी विक्रम पवार प्रसिद्धी प्रमुखपदी आकाश इंगोले यांची निवड