नांदेड दि. 12 -
मुखेड तालुक्यातील मौजे वसूर येथील 7/12 नोंदीनुसार असलेल्या मागासवर्गीय स्मशानभूमीच्या जागेवर लगतच्या शेतकर्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून नियमबाह्य अतिक्रमण केलेले होते. त्यामुळे मागासवर्गीय समाजास 7/12 वर स्मशानभूमी/मसनवटा म्हणून नोंद असूनही प्रत्यक्षात जागा उपलब्ध नव्हती आणि वसूर येथील मागासवर्गीय समाजास अनेक अडचणींना सामोरे जात मृत व्यक्तीवर कुठेतरी अंतिमसंस्कार उपकून घ्यावे लागत होते. ही बाब महसूल प्रशासन यांच्या निदर्शनास आणून मौजे वसूर ता. मुखेड येथील मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेवर झालेले अतिक्रमण हटवून ती जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन व मागासवर्गीय ग्रामस्थांनी गेल्या वर्षभरापासून जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासन यांच्याकडे करीत होते.
मौजे वसूर ग्रामपंचायतीमार्फत स्मशानभूमीच्या जागेची मोजणी अर्ज केल्यानंतरही भूमी अभिलेख कार्यालय मुखेड आणि तहसील कार्यालय मुखेड यांच्याकडून कोणत्या न कोणत्या कारणास्तव मोजणी पूर्ण करून/सिमांकन करून हद्द निश्चितीची कार्यवाही काही पूर्ण होत नव्हती. मोजणीच्या तब्बल 5 तारखा दिल्यानंतर अखेर 2 मे रोजी मोजणी प्रक्रिया पूर्ण केली आणि 7 मे रोजी अखेर स्मशानभूमीच्या जागेची हद्द निश्चिती करण्यात आली. तसे ताबा पत्र तहसील कार्यालय मुखेडचे नायब तहसीलदार गंगनर, मंडळ अधिकारी व तलाठी यांनी ग्रामपंचायतीचे सरपंच/ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे जायमोक्यावर पंचासमक्ष व उपस्थितांसमक्ष दिले.
मौजे वसूर येथील मागासवर्गीय स्मशानभूमीच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी व मोजणी करून हद्द निश्चित करण्यासाठी अतिशय मोलाचे सहकार्य मुखेड तालुक्याचे आमदार डॉ. तुषार राठोड, प्रशासकीय पातळीवरील निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, तहसीलदार राजेश जाधव, नायब तहसीलदार गंगनर, मंडळ अधिकारी कोनुले, मुक्रमाबाद पोलीस स्टेशनचे पो.नि. तिडके, भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक मोरे आणि त्यांचे कर्मचारी, ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिनिधी रमेश पा.शिंदे, ग्रामविकास अधिकारी पी.जी. नागेश्वर आदींनी सकारात्मकरित्या सहकार्य केल्यामुळे वसूर येथील समस्त मागासवर्गीय समाजाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटवून जागा उपलब्ध करून देण्यात यासाठी अण्णा भाऊ क्रांती आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष सतीश कावडे आणि वसूर येथील बौद्ध व मातंग समाज एकत्रितरित्या अविरतपणे लढा संघर्ष केल्यामुळे स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. यासाठी वसूर येथील व्यंकट घाटे, आतीत घाटे, निवृत्ती कावडे, रामराव कावडे, गणपती कावडे, समृत कावडे, झरीबा कावडे, अनिल कावडे, नागनाथ कावडे, रविंद्र कावडे, अरविंद शिंदे, रमेश शिंदे, उत्तम शिंदे, पंढरी शिंदे, भीमा शिंदे, इंद्रजीत कावडे, यशवंत शिंदे, प्रशांत शिंदे, रामचंद्र महाराज, धोंडिबा घाटे, आत्माराम घाटे, यादव घाटे, हनमंत कावडे, धोंडिबा शिंदे, महादू शिंदे, दिलीप शिंदे, विश्वनाथ शिंदे, दयानंद शिंदे, सतीश शिंदे, चंद्रकांत कावडे, बापुराव कावडे, निखील कावडे, सतीश झरीबा, राजू कावडे, चांद कावडे, केशव कावडे, पंढरी कावडे, यादव कावडे, अच्युत कावडे, व्यंकट कावडे आदींसह समस्त मागासवर्गीय समाजाने या कामी परिश्रम घेतले.
--------