Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या जागेविषयीच्या प्रश्नाविषयी जिल्हाधिकाऱ्यां च्या दालनात निर्णय होणार

 


किनवट/प्रतिनिधी:शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थापन संदर्भात सुरू असलेल्या मतभेदावर तोडगा काढण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी झेनित चंद्रा दोनतुला यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वपूर्ण बैठक पार पडली.

   ही बैठक त्यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी अभय नगराळे ,राहुल कापसे, अमरदीप कदम, बाळकृष्ण कदम ,उमाकांत कराळे ,अजय कदम ,विवेक ओंकार यांना अधिकृत पत्राद्वारे आमंत्रित करण्यात आले होते.

      तसेच नगरपरिषद किनवट तर्फे माजी नगराध्यक्ष आनंद माच्छेवार आणि मुख्याधिकारी डॉक्टर अजय कुरवाडे हे उपस्थित होते. दरम्यान माजी नगराध्यक्ष साजिद खान, माजी उपनगराध्यक्ष अभय महाजन, माजी नगरसेवक शिवा क्यातमवार यांनी आयत्यावेळी विनंती करून सहभाग नोंदवला.

    सदर बैठकीत पुतळा स्थापन होणाऱ्या जागेवरून निर्माण झालेल्या मतभेदावर सर्व संबंधित पक्षाचे म्हणणे ऐकून घेतले.

 या संदर्भात सहाय्यक जिल्हाधिकारी झेनिथ चंद्रा दोनतुला यांनी संपूर्ण अहवाल जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे सादर केला जाणार असल्याची माहिती दिली.

    आता या प्रश्नावर अंतिम निर्णय जिल्हाधिकारी देणार आहेत. त्यामुळे या बाबीकडे सर्वांचे लक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लागले आहे.

   दरम्यान छत्रपती शिवरायांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेचा विषय गेले अनेक दिवसापासून चर्चेचा असला तरी यावर तोडगा अध्याप निघालेला नाही.

Breaking News

आदिलाबाद परळी रेल्वे  मधून अवैधरित्या सागी माल वाहतूक करताना तपासणी अंती जप्त