Ticker

6/recent/ticker-posts

आ.भीमराव केराम यांची महाराष्ट्र विधान मंडळाच्या दोन महत्त्वपूर्ण समित्यावर नियुक्ती


किनवट/(आनंद भालेराव):किनवट माहूर विधानसभा क्षेत्राचे आमदार भीमराव किरण यांची महाराष्ट्र विधान मंडळाच्या दोन महत्त्वपूर्ण समित्या व नियुक्ती करण्यात आली आहे.

 महाराष्ट्र विधानसभा मंडळ सचिवालयाने नुकत्याच पाठविलेल्या पत्राद्वारे याबाबतची माहिती दिली आहे आमदार भीमराव यांची राज्याच्या अनुसूचित जाती कल्याण समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष पद आमदार नारायण कुचे यांच्याकडे असून राज्यातील इतर विधानसभा सदस्यही या समितीमध्ये आपली भूमिका बजावणार आहेत.

 या समितीमार्फत अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी च्या योजना आणि धोरणाची प्रभावी अंमलबजावणी तसेच त्यासंबंधीच्या मुद्द्यावर चर्चा आणि निर्णय घेतले जातील याशिवाय आमदार केराम यांची आहार व्यवस्थापन समितीवरही निवड करण्यात आली आहे.

 या समितीचे प्रमुख आमदार डॉक्टर बालाजी किनीकर असतील आहार व्यवस्थापन समिती राज्यातील अन्नपुरवठा सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि संबंधित धोरणावर देखरेख ठेवते या समितीच्या माध्यमातून आमदार किरण यांना राज्याच्या आहार व्यवस्थापनाच्या पारदर्शक आणि कार्यक्षम कारभारासाठी योगदान देण्याची संधी मिळणार आहे.

 राज्य शासनाने आमदार केराम यांना या दोन दोन महत्वपूर्ण समित्यावर नियुक्ती देऊन त्यांच्यावरील विश्वास दृढ केला आहे. आमदार केराम यांच्या कुशल प्रशासकीय कौशल्यामुळे आणि जनसंपर्कामुळे या समित्यांच्या माध्यमातून संबंधित विभागाचा कारभार अधिक पारदर्शक आणि सुधारणा केंद्रित होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

 किनवट माहूर मतदारसंघातील जनतेनेही आमदारकीराम यांच्या नियुक्तीचे स्वागत केले असून त्यांच्या कार्यकाळात मतदार संघाचा आणि राज्याच्या विकासाला चालल्यामुळे अशा अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Breaking News

आदिलाबाद परळी रेल्वे  मधून अवैधरित्या सागी माल वाहतूक करताना तपासणी अंती जप्त