जिवती-16-जिवती तालुक्यातील मरकागोंदी येथे आज दिनांक 16 5 2025 रोजी पाडदे परिवार व जाधव परिवार यांचा विवाह सोहळा संपन्न झाला या विवाह सोहळ्यासाठी तालुक्यातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या विवाह सोहळ्यात मुंबई येथील आजाद मैदानावर होणाऱ्या 20 तारखेला महामोर्चात सर्वांनी उपस्थित राहण्यासंदर्भात मार्गदर्शन प्रा. सुग्रीव गोतावळे यांनी केले व आरक्षण उपवर्गीकरण मातंग समाजासाठी किती महत्त्वाचे आहे आरक्षण नसल्यामुळे मातंग समाजाची आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे आज हजारो युवक बेरोजगार असून आजच्या या स्पर्धेत त्यांची पात्रता नसल्यामुळे ते आज नोकरी पासून वंचित राहिले आहे त्यामुळेच जातीनुसार लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना आरक्षण मिळाले. तर समाजाची उन्नती होऊ शकते असे मार्गदर्शन त्यांना करण्यात आले. व मोर्चाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आव्हान करण्यात आले. यावेळी उपस्थित श्री नागनाथ महाराज तोगरे, रमेश पाळदे, श्री केशव गव्हाले श्री बालाजी गवाले श्री बेले श्री मोरे श्री जाधव श्री गायकवाड श्री कांबळे श्री वाघमारे व अन्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.