कोलांडी येथे जनजागृती सभेस उत्स्फूर्त प्रतिसाद
जिवती:-सकल मातंग समाजाच्या वतीने दि 20 मे 2025 ला आझाद मैदान मुंबई येथे अनु जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ व्हावे यासाठी जनआक्रोश आंदोलन होणार आहे. त्याची प्रसिद्धी आणि प्रचार सभा नुकतीच कोलांडी येथे पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी राज्यसमनवयक डॉ अंकुश गोतावळे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा सुग्रीव गोतावळे, श्री विजय गोतावळे हे उपस्थित होते.
सभेचे प्रास्ताविक श्री परशुराम नामपले सर यांनी आभार प्रदर्शन श्री शिवदास गुंडले यांनी सूत्रसंचालन श्री नामदेव मोरताटे यांनी तर पाहुण्यांचे स्वागत श्री गजानन वाघमारे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बापुराव नामपल्ले,रमेश नामपल्ले,संदेश नामपल्ले,किसन नामपले,खंडू गुंडले,कैलास गुंडले,
साईराम गुंडले,आकाश गुंडले,अशोक नामपल्ले,रानबा दुईले,गणेश वाघमारे, लक्ष्मण कोमले,काशिनात कोमले,गणेश पोटवले,ज्ञानोबा पोटवले,गोविंद सूर्यांशी,गोकुळ सूर्यांशी,दत्ता भालेराव,तिरुपती भालेराव,रमेश सूर्याशी तसेच गावातील महिला, युवक, युवती ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.