Ticker

6/recent/ticker-posts

पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीसाठी माजी नगरसेविका सौ. अनुसया अन्नेलवार यांचे आ. भीमराव केराम यांना निवेदन

 प्रभाग क्रमांक 2 मधील विद्युत तारा व उपकरणांची दुरवस्था; 


किनवट (प्रतिनिधी) दि.30
: प्रभाग क्रमांक 2 मधील विद्युत तारा, उपकरणे, वितरण व्यवस्था व इन्सुलेशनची अत्यंत जीर्ण अवस्था असून लवकरात लवकर दुरुस्ती न झाल्यास पावसाळ्यात विद्युत पुरवठा खंडित होऊ शकतो तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे  महावितरणच्या अधिकाऱ्यांना तत्काळ दखल घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी माजी नगरसेविका सौ. अनुसया मधुकर अन्नेलवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.


या संदर्भात त्यांनी आमदार भीमराव केराम यांची भेट घेऊन एक सविस्तर निवेदन सादर केले. सदर निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, प्रभाग क्रमांक 2 मधील अनेक भागांत विद्युत तारा झाडांमध्ये अडकलेल्या आहेत, काही ठिकाणी इन्सुलेशन पूर्णतः झिजलेले असून वायरमधून थेट टेन्शन येत आहे. यामुळे लहान मुले, वृद्ध आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, यापूर्वीही अशा स्थितीत काही लहान मोठे अपघात घडलेले आहेत.


माजी नगरसेविका अन्नेलवार यांनी मागणी केली आहे की, प्रभाग क्रमांक 2 मध्ये महावितरणने संपूर्ण तपासणी करून जुने खांब, झिजलेल्या वायर, कमकुवत इन्सुलेशन व झाडांमध्ये अडकलेल्या तारा यांचे तातडीने निराकरण करावे. पावसाळ्याच्या तोंडावर अशा स्थितीने गंभीर परिणाम होऊ शकतात.


या निवेदनाची दखल घेत आमदार भीमराव केराम यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्याचे आश्वासन दिले. तसेच, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही तडजोड न करता सर्व यंत्रणा सतर्क राहाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.


स्थानिक नागरिकांनी माजी नगरसेविका अन्नेलवार यांच्या या पुढाकाराचे स्वागत केले असून महावितरणने लवकरात लवकर आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Breaking News

आदिलाबाद परळी रेल्वे  मधून अवैधरित्या सागी माल वाहतूक करताना तपासणी अंती जप्त