किनवट/प्रतिनिधी: दिनांक 31 मे 2025 रोजी शनिवारी विज्ञान क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व मुलांसाठी "चाणक्य सायन्स अकॅडमी" या कोचीन सेंटरचे उद्घाटन समारंभ व दहावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा ज्ञानसागर स्टडी पॉईंट शेजारी रोड नांदेड रोड गोकुंदा किनवट येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री आनंदरावजी वाढई हे असतील तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री आर आर जाधव सर तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री गोविंदवाड, श्रीमती डॉक्टर भाग्यश्री वाघमारे, श्री रामप्रसाद तौर, पी आर वाडेकर हे राहणार आहेत. प्रमुख उपस्थिती श्री एडवोकेट सुरज खाडे, सुनील जोगी, संजय लेंडे, संजय गुरनुले, विठ्ठल सल्लावार ,मधुसूदन पहुरकर, संतोष कोतपल्लीवार, अजय जोगी, पी बी टारपे, सतीश राऊत, बजरंग वाडगुरे, पांडुरंग गुरनुले तथा सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी, पालक उपस्थित राहणार असल्याचे चाणक्य सायन्स अकॅडमी चे संचालक इंजिनिअर तानाजी एस. गुरनुले व सहसंचालक प्राध्यापक आनंद भुसारे यांनी कळविले आहे.