Ticker

6/recent/ticker-posts

अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी सोहळ्याची सांगता

 


किनवट - अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी समारोहाची सांगता आ. भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख  यांच्या  प्रमुख उपस्थितीत शनिवारी दि. ३१ पैनगंगा नदीतिरावरील शिव मंदिरात  महाआरतीने झाली.                             
   
त्रिशताब्दी समारोहाचे आयोजन शहर तालुकाध्यक्ष स्वागत आयनेनीवार यांनी केले होते.यावेळी महिलांच्यावतीने शिवमंदिरात महापूजा,महाआरती करण्यात आली.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी समारोहाच्या औचित्याने शालांत प्रमाणपत्र परीक्षेत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या अक्षरा आशिष देशपांडे ह्या विद्यार्थिनीचा आ.भीमराव केराम,अॅड.किशोर देशमुख यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, भेटवस्तु देवून सत्कार करण्यात आला. 

 यावेळी  सुधाकर भोयर,  माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, बाबुराव केंद्रे, राघू मामा, दत्ता आडे, संजीव रेड्डी, आशिष देशपांडे, बाळकृष्ण कदम, नवीन राठोड, विश्वास कोल्हारीकर, शिवाजी आंधळे, मारूती भरकड, अजय चाडावर, बालाजी धोत्रे, संतोष चनमनवार, रवी चव्हाण, मधुकर अन्नेलवार, शिवा क्यातमवार, जयराज वर्मा,  राजेंद्र भातनसे, मुकुंद नेम्मानीवार,संजय रावल,रमेशचंद्र दारमवार,भावना दीक्षित,गंगुबाई परेकार, पूनम दीक्षित, सागर शिंदे,   इंदूबाई कनाके, प्रभावती गुऱ्हे, नरेश सिरमनवार, गजानन मुंडे, सतीश बिराजदार, जगदिश तिरमनवार, सुरेश साकपेल्लीवार, राहुल दरगुलवार,  नरसिंग टक्कलवार, कृष्णा इटकेपेल्लीवर, राजेंद्र जयस्वाल, कृष्णा कालकुंतावर,शंकर मानकर, मनोज जाधव, शिवाजी काळे,राघवेंद्र जयस्वाल, शंकर निळावर,विक्रांत दग्गुलवार आदी उपस्थित होते.

Breaking News

आदिलाबाद परळी रेल्वे  मधून अवैधरित्या सागी माल वाहतूक करताना तपासणी अंती जप्त