जिवती :-सकल मातंग समाज वर्धा च्या वतीने जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सकल मातंग समाजाचे राज्यसमन्वयक डॉ अंकुश गोतावळे हे होते. बैठकीमध्ये अनु जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण होणे का गरजेचे आहे याची इत्यंभूत माहिती डॉ गोतावळे यांनी दिली. मुख्यत्वे 20 मे 2025 रोजी आझाद मैदान मुंबई येथे होणाऱ्या जनआक्रोश आंदोलनामध्ये जास्तीतजास्त समाज बांधवाना उपस्थित राहण्याचे नियोजन करण्यात आले.बैठकीचे आयोजन श्री अमोल खंदार, श्री गणेश मुंगळे यांनी केले होते. बैठकीसाठी जिल्ह्यातील वेगवेगळ्या संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये प्रामुख्याने श्री राजेश अहिव,श्री विलास डोंगरे, अशोक डोंगरे, फकिरा खडसे, संगीता वानखेडे, सुमनताई बावणे, सतीश गवळी, नितेश कांबळे, तुकाराम हत्तीटेल, प्रफुल कांबळे, प्रवीण डोंगरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते