Ticker

6/recent/ticker-posts

नांदेड तालुका व नांदेड शहर,सिडको -हडको,नवीन नांदेड शहारातील प्रमुख कार्यकर्त्याची महत्त्वाची बैठक



Ktnnewslive: दि.२० मे च्या जन आक्रोश आंदोलनानिमित्ताने महत्वप समाजातील लेकरांच्या भल्यासाठी आणि आपल्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नांसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने दिनांक २० मे २०२५ रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर जन आक्रोश महा आंदोलन आयोजित केले आहे. 

    नांदेड शहर व जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी होण्याच्या नियोजन संदर्भात चर्चा करण्यासाठी  *दिनांक १८/०५/२०२५ रोजी सायंकाळी  ०५:०० पाच वाजता *शासकीय विश्रामगृह (VIP) नांदेड** येथे महत्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे.

या बैठकीला राज्य समन्वयक माजी आमदार अविनाश रावजी घाटे साहेब व ॲड.सुरेंद्र घोडजकर साहेब यांच्यासह समाजातील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

     सदर बैठकीला नांदेड तालुक्यातील आणि सिडको - हडको व नांदेड शहरातील सर्व मातंग समाजातील वेगवेगळ्या संघटना प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थिती आवश्यक आहे.

     तरी नांदेड तालुक्यातील ,शहरातील आणि सिडको-हडको, नाविन नांदेड भागातील सर्व,

माजी उपमहापौर,आजी-माजी सभापती ,आजी- माजी नगरसेवक व सर्व सामाजिक संघटनांतील प्रमुख, जिल्ह्यातील आजी-माजी- जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य,तथा लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व कर्मचारी संघटनेतील अधिकारी व कर्मचारी या सर्वांनी आपली सामाजिक बांधिलकी समजून बैठकीस उपस्थित राहून सहकार्य करावे ही विनंती... 

                 *विनीत* 

*आनंदराव गुंडले (माजी जि. प.सदस्य)*

 *माधव डोम्पले ( युवा उद्योजक)* 

*सकल मातंग समाज, नांदेड*

Breaking News

आदिलाबाद परळी रेल्वे  मधून अवैधरित्या सागी माल वाहतूक करताना तपासणी अंती जप्त