किनवट: किनवट शहरातील शिवाजीनगर रेल्वे भुयारी मार्ग एकेरी आणि अरुंद असा होणार असल्यामुळे सरस्वती विद्या मंदिर परिसरातील नागरिक तसेच बेल्लोरी मांडवा नागझरी झेंडीगुडा आदी गावकर्यांना किनवट शहर तसेच रेल्वे स्टेशनला जाणे भावी काळात फार अडचणीचे ठरणार असून बांधकाम ट्रॅक्टर ट्रक आदी जड वाहने स वि म परिसरात येऊ शकणार नाहीत* सुभाष नगर दुहेरी भुयारी मार्गाने किनवट शहरात जाणे म्हणजे सुमारे अडीच किमी फेरा आहे दुर्दैवाणे कधी अग्निशामक गाडी चे काम पडलेच तर अशक्य आहे शिवाय वर्दळीच्या वेळी सकाळी शाळा महाविद्यालय विद्यार्थी, दुचाकी वाहने चार चाकी वाहने एकाच बोगद्यातून कसे येणे जाणे करणार ही मोठी समस्या आहे
*दुसरा पर्यायी मोठा भुयारी मार्ग जुन्या बेल्लोरी रस्त्यावरून डॉ बेलखोडे साने गुरुजी रुग्णालय बाजूने फक्त प्रस्तावित असून त्याला रेल्वे बोर्ड मंजुरी अद्याप नाही त्यानंतर टेंडर प्रक्रिया ते अवघड दिसते*.. *त्यामुळे आता सरस्वती विद्या मंदिर परिसर नागरिक आणि अन्य गावचे ग्रामस्थ यांनी DRM नांदेड तसेच GM secundrabad यांना या बाबतीत जाब विचारून दुहेरी भुयारी मार्ग त्वरित मागितला पाहिजे* *अन्यथा अनेक समस्या ग्रस्त आपला प्रभाग नेहमी अविकसित, दुर्लक्षित राहील आणि भागाचा भावी विकास थांबेल*... *सर्व भावी नगर सेवक यांनी लक्ष घालावे लागेल*... *राजकारण न करता नेतृत्व करून समस्या सोडवली पाहिजे*...