Nanded: कीय नेते/कार्यकर्ते जेव्हा सामाजिक चळवळीचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा सामाजिक चळवळ हळूहळू नष्ट होणार हे ठरलेलं असतं. राजकीय नेते/कार्यकर्ते यांच्यात ( विशेषतः मातंग राजकीय नेते/कार्यकर्त्यांमध्ये इतर जातींच्या राजकीय नेत्यां पेक्षा social understanding चा अभाव असल्याने))पराकोटीची राजकीय महत्त्वाकांक्षा असते. त्यापायी ते चळवळीचा आधार घेत वेळ आली की समाजाच्या मानेवर पाय देऊन राजकीय स्वार्थ साधण्याच्या प्रयत्न करीत असतात. उलट सामाजिक नेत्यांना राजकीय काही अभिलाषा नसते. सामाजिक बांधिलकीतून ते चळवळ करीत असल्याने असे नेते/कार्यकर्ते सामाजिक चळवळीला न्याय देऊ शकतात. राजकीय नेते/कार्यकर्ते स्वतःच्या स्वार्थापोटी सामाजिक चळवळीला राजकीय पक्षाच्या दावणीला नेऊन बांधतात आणि चळवळ विकून खातात. आता पर्यंत सकल मातंग समाज चळवळीचे तेच प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सकल मातंग समाजाची चळवळ reverse आली आहे. असे होण्याची शक्यता असल्याने मी सकलच्या निर्मिती पासून राजकीय नेत्यांनी/कार्यकर्त्यांनी या चळवळीत backfoot राहून आणि सामाजिक नेत्यांना/कार्यकर्त्यांना पुढे ठेवून चळवळीत सक्रिय रहावे अशी वारंवार भूमिका मांडली आहे. त्यामुळे आमच्या सारख्यांना सतत दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. अर्थात काहीही झाले तरी या चळवळी पासून आम्ही दूर होऊच शकत नाही हे या लोकांना कळत नाही.
20 मे च्या आंदोलनात सकल मातंग समाज चळवळीची विश्वासाहर्ता समाजा मध्ये आणि सरकारकडे धुळीस मिळालेली आहे. सोबतच आरक्षण वर्गीकरण या सामाजिक न्यायाच्या चळवळीची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे. परंतु हे समाजाला अजिबात परवडणारे नाही. आरक्षण वर्गीकरणाची चळवळ सक्षमपणे आणि गतीने पुढे गेली तरच आपल्या पुढील पिढीचा उद्धार होणार आहे. तेव्हा समाजाने आता या चळवळीतील राजकीय नेते/ कार्यकर्ते यांना खड्या सारखे बाजूला सारून प्रामाणिक सामाजिक नेत्यांना पुढे करून ही चळवळ पुढे घेऊन जाणे अत्यंत आवश्यक आहे. आता सामाजिक नेत्यांवर सुद्धा जबाबदारी ठेपली आहे. मातंग समाजातील सर्व सामाजिक संघटनां प्रमुखांनी उच्च सामाजिक बांधिलकी दाखवत अगदी शुद्ध भावनेने एकत्र येऊन ही चळवळ खांद्यावर घ्यावी आणि आणि चळवळ यशस्वी करावी. अन्यथा या महत्त्वाच्या टप्प्यावर सामाजिक शिलेदारांनी शस्त्र खाली टाकली तर भावी पिढी आपल्याला कदापि माफ करणार नाही आणि तशी वेळ येणार नाही असा दृढ विश्वास आहे.
-केशव शेकापूरकर, नांदेड