Ticker

6/recent/ticker-posts

मातंग समाजाचे राष्ट्रीय लोकनेते मंदाकृष्णा मादिगा अण्णा यांना महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते "पद्मश्री पुरस्कार"ने सन्मानित


नांदेड: अनुसूचित जातीतील शोषित,पिडीत, वंचितांना न्याय,हक्क व आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून अविरतपणे अख्खी हयात संघर्ष लढा दिला.नव्हे तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत न्यायीक लढा दिला.त्याचे फलित ही मिळाले.परंतू जो पर्यंत अनु.जाती आरक्षण उपवर्गीकरण लागू होणार नाही तो पर्यंत पुरस्कार स्विकारणार नाही असा ठाम निश्चय सरकारला सुणावला.अखेर तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्यात अनु.जाती आरक्षण उपवर्गीकरण लागू करण्यात आले.यानंतरच त्यांनी पुरस्कार स्विकारला...
या सामाजिक न्यायाचे शिल्पकार,मादिगा व मातंग समाजाचे लढवय्ये राष्ट्रीय लोकनेते आदरनिय मंदाकृष्णा मादिगा अण्णा  यांना महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते "पद्मश्री पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले.

हा सन्मान सामाजिक लढ्यातील तमाम सहभागींचा आहे. तसेच आदरनिय अण्णा यांना देशाच्या उच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले याचा देशातील सर्वच मातंग समाजाला अभिमान आहे.

पद्मश्री लोकनेते मंदाकृषणा मादिगा अण्णा यांचे अगदी मनापासून खुप खुप अभिनंदन व पुढील सामाजिक कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

Breaking News

आदिलाबाद परळी रेल्वे  मधून अवैधरित्या सागी माल वाहतूक करताना तपासणी अंती जप्त