मुंबई: अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील आदिवासी आमदार व आदिवासी सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासोबत आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेऊन आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली.
यावेळी पेसा भागांमध्ये आदिवासी कर्मचाऱ्यांची भरती करणे, सध्याच्या आदेशातील विसंगती दूर करणे, अधिसंख्य पदे, अवैधरित्या जात प्रमाणपत्र रोकण्यासंदर्भात संबंधात कायदा करणे, आदिवासी विद्यापीठाची स्थापना करणे, आदिवासी मुलामुलींसाठी मुंबई व पुणे येथील विद्यापीठांमध्ये वसतिगृहे निर्माण करणे, प्रलंबित वनदावे निकाली काढणे, आदिवासी सल्लागार परिषदेच्या बैठकी वर्षातून दोनदा घेणे, यांसह विविध विषयांवर चर्चा झाली.
बैठकीला आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, राजेंद्र गावित, राजू तोडसाम, आमश्या पाडवी, नितीन पवार तसेच आदिवासी सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.