मुंबई: मुंबई काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तापदी सुरेशचंद्र राजहंस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी त्यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
सुरेशचंद्र राजहंस यापूर्वी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ता, मुंबई काँग्रेसचे स्लम सेलविभागाचे अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता अशा महत्त्वपूर्ण पदावर त्यांनी कार्य केले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी प्रवक्ता आणि मीडिया समन्वयक अशी दुहेरी भूमिका पार पाडली आहे. 2022 मध्ये त्यांना न्यूज पेपर समूहतर्फे "आयडॉल ऑफ महाराष्ट्र" पुरस्काराने सन्मानित केले होते. तसेच 2023 मध्ये प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्यामुळे त्यांना "राज्यस्तरीय पुरस्कार" देऊन सन्मानित केले होते.
त्यांच्या निवडीमुळे महाराष्ट्रातील त्यांच्या चाहत्याकडून अभिनंदनाचा वर्ष होत आहे.