Ticker

6/recent/ticker-posts

पेटकुले नगर गोकुंदा येथील खराब रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी नागरिकांची मागणी

 


गोकुंदा: पेटकुलेनगर गोकुंदा येथील अंतर्गत रस्ते खूपच खराब झाले असल्यामुळे या रस्त्यावर खड्डे पडले असून शाळकरी मुले, वृद्ध नागरिक, रुग्ण यांना ये जा करण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे.

   यासंबंधी गोकुंदा ग्रामपंचायत येथील सदस्यांना वारंवार सांगूनही सदस्यांनी व ग्रामपंचायतीने या रस्त्याकडे लक्ष दिले नाही.

   


तेव्हा मा.आमदार भीमराव केराम यांनी या बाबीकडे लक्ष देऊन रस्ते दुरुस्ती करण्यासंबंधी  निदर्शित करावे. पेटकुलेनगर मधील गल्लीबोळामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी साचल्यामुळे व मोठ- मोठे खड्डे पडल्यामुळे येथील रहिवाशांना त्रास होत आहे. सदरील रहिवाशांना या त्रासापासून मुक्ती देण्यासाठी सदरील रस्त्याचे डांबरीकरण किंवा सिमेंट काँक्रिटीकरण करावे अशी मागणी येथील रहिवाशांनी आमदार भीमराव केराम यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

   मा.आमदार भीमराव केराम यांनी सदरील रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करून देण्याचे आश्वासन पेटकुलेनगरवाशी यांना दिले आहे.

Breaking News

आदिलाबाद परळी रेल्वे  मधून अवैधरित्या सागी माल वाहतूक करताना तपासणी अंती जप्त