किनवट/(आनंद भालेराव ): महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदा, मातोश्री कमलाताई ठमके विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदा यांच्यातर्फे राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार भीमराव केराम हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून किनवट गटशिक्षणाधिकारी अनिल कुमार महामुने, शुभांगीताई ठमके, प्रशांत ठमके, प्रदीप नाईक, गोवर्धन मुंडे, आनंद मच्छेवार श्रीनिवास नेमानीवार,उत्तम कानिंदे आदी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात झाली. याप्रसंगी नीट परीक्षेत व इतर परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या पालकासह सत्कार करून मानचिन्ह देण्यात आले.
याप्रसंगी किनवट गटशिक्षणाधिकारी श्री अनिलकुमार महामुने, आमदार भीमराव केराम व इतर मान्यवरांचे मार्गदर्शनपर भाषणे झाली कार्यक्रमास महात्मा फुले महाविद्यालय व कमलाताईक ठमके कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.