घुंगराळा/ नायगाव: वसंत सुगावे पाटील यांच्या वतीने घुंगराळा येथील गुणवंत विद्यार्थी व शासकीय सेवेत निवड झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सन्मान सोहळा संपन्न.. !!
घुंगराळा:विद्यार्थी व युवकांनी अभ्यासात सातत्य ठेवल्यास त्यांना निश्चीतपणाने यश मिळेल असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते *आ.प्रतापराव पा.चिखलीकर* यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांच्या वतीने आयोजित केलेल्या घुंगराळा येथील गुणवंत विद्यार्थी व शासकीय सेवेत निवड झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सत्कार सोहळा या कार्यक्रमात काढले.
घुंगराळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी गुणवंत विद्यार्थी व शासकीय सेवेत निवड झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता. *गुणवंताचा सत्कार आ.प्रतापराव पा.चिखलीकर यांच्या शुभहस्ते* करण्यात आला. कार्यक्रमाच्या *अध्यक्षस्थानी जि. प. माजी सभापती शिवराज पा.होटाळकर* यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून *राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजीराव शिंदे,बिलोली पंचायत समितीचे* *मा. उपसभापती अशोक पा. मुगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशसहसचिव प्रा. सुनील नानवटे,महिला व बालकल्याण* *समितीचे सदस्य किशोर नावंदे,कुंटूर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले साहेब,नायगाव* *पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय मिरजकर साहेब,महावितरण चे उपअभियंता शिंदे साहेब,सचिन* *नाईक,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मा.तालुकाध्यक्ष विश्वनाथ बडूरे,परबत पा.जाधव ,घुंगराळा ग्रामपंचायत च्या सरपंच सौ. रुक्मिणीबाई पांचाळ* आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात 10 वी,12 वी ,व इतर स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व शासकीय सेवेत निवड झालेल्या 70 गुणवंताचा आ.चिखलीकर साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच नायगाव पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी म्हणून रुजू झालेले संजय मिरजकर, कुंटूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले साहेब, महावितरण चे उपअभियंता शिंदे साहेब यांचाही आ.चिखलीकर साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात छावा संघटनेचे राजेश मोरे देगावकर यांनी आ.चिखलीकर साहेब यांच्याहस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी दिलीपराव धर्माधिकारी, शिवराज पा.होटाळकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत सुगावे पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.माधव यमलवाड यांनी तर परबता हणमंते गुरुजी यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास सावरखेड,रुई,निळेगव्हाण,आंतरगव,कृष्णर,वंजारवाडी, यासह अनेक गावचे सरपंच,चेअरमन, विद्यार्थी,पालक ,नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.