Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत रोजगार मेळाव्याचे आयोजन

 


रोजगार मेळाव्यात 275 उमेदवारांची प्राथमिक निवड

रोजगार मेळाव्यात 16 कंपन्यांचा 1 हजार 513  रिक्तपदांसाठी  सहभाग


नांदेड, दि. 30 जून:- युवक- युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र व  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने शुक्रवार 27 जून रोजी श्री गुरूगोविंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात 275 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.


या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द उद्योजक अभिजीत रेणापूरकर तर अध्यक्ष आदित्य मोटर्सचे उद्योजक अरूणजी फाजगे हे होते.  जिवन हे एक शर्यत आहे. या शर्यतीमधुन अनेक गोष्टी बदल होतात. इथं जी संधी उपलब्ध करून दिली त्या संधीचा फायदा सर्वानी घ्यावा, असे मार्गदर्शन उद्योजक अभिजीत रेणापूरकर यांनी विद्यार्थ्यांना केले. तसेच शिक्षण घेत असताना गुरूजनांचा विचार करा, समाजात वागताना आईवडीलांकडे बघा, संधीच सोन करा असा संदेश आदित्य मोटर्सचे उद्योजक अरूणजी फाजगे  यांनी  दिला.



विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य विकसित करावे. सध्या या जगात कौशल्यालाच मागणी आहे. या आधुनिक जगात कौशल्य नसल्यास जीवन जगणे कठीण आहे असे आवाहन  कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त डॉ. रा.म.कोल्हे यांनी केले.


या रोजगार मेळाव्यामध्ये  एकूण 16 कंपन्यांनी 1 हजार 513  रिक्तपदांसाठी  सहभाग नोंदविला होता. तर एकूण 560 उमेदवार उपस्थीत होते यामधून 275 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे अशी माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने दिली आहे.

00000

Breaking News

आदिलाबाद परळी रेल्वे  मधून अवैधरित्या सागी माल वाहतूक करताना तपासणी अंती जप्त