Ticker

6/recent/ticker-posts

कॉम्रेड यादवराव गायकवाड यांना स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन!*

 


नांदेड: प्रतिकूल परिस्थितीत कॉम्रेडशिप जपणाऱ्या आंबेडकरवादी व मार्क्सवादी चळवळीवर विश्वास ठेऊन कधीही वैचारिक तडजोड न करणाऱ्या कॉ.यादवराव गोविंदराव गायकवाड यांना त्यांच्या तृतीय स्मृतिदिना निमित्ताने संघर्ष भवन सीटू कार्यालयात जनवादी संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.


मुळचे विदर्भातील व मागील पन्नास वर्षांपासून नांदेड  शहरात व जिल्ह्यात स्थायिक आसलेले गायकवाड कुटुंबीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या विविध जनसंघटनेत काम करतांना आढळून येतात.


त्यांचा जन्म ढाणकी ता.उमरखेड जि.यवतमाळ येथे १६ ऑगस्ट १९१७ रोजी झाला.ते अंधश्रद्धा आणि दैवीशक्तीच्या विरोधात कायम होते व त्यांनी तत्वासोबत कधीही तडजोड केली नाही.

त्यांचा मृत्यू २२ जुलै २०२२  रोजी नांदेड येथे झाला.

त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती.

त्यांच्यावर क्रांतिसिंह नाना पाटलांचा विशेष प्रभाव होता.

डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्यावर त्यांची निष्ठा होती.

ते आंबेकरवादी व मार्क्सवादी कार्यकर्ते होते.

त्यांच्या प्रभावाने त्यांच्या कुटुंबातील अनेक जन आज सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन,अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया, स्टुडन्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया, जाती अंत संघर्ष समिती, अंधश्रद्धा निर्मूलन समितीत कार्य करतांना आढळतात.

मुंबई आझाद मैदान पोलीस स्थानकासह महाराष्ट्रातील विविध पोलीस स्थानकात त्यांच्या कुटूंबातील सदस्यावर आंदोलनात गुन्हे दाखल आहेत.

त्यांचा मुलगा कॉ.गंगाधर गायकवाड हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे व सीटू कामगार संघटनेचे लढाऊ व संघर्षशील कार्यकर्ते आहेत. तर सुनबाई,पुतणे,नातवंड व मुली देखील वेगवेगळ्या जनवादी संघटनेत कार्य करतात.

 तृतीय स्मृतिदिनी संघर्ष भवन सीटू कार्यालयात अभिवादन करण्यात आले.

यावेळी सीटू राज्य सचिव कॉ.उज्वला पडलवार, जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ अनंतवार,जमसंच्या जिल्हा अध्यक्षा कॉ.लता गायकवाड,घरकामगार संघटनेच्या अध्यक्षा कॉ.करवंदा गायकवाड,डीवायएफचे कॉ.जयराज गायकवाड,असंघटित कामगार संघटनेच्या कॉ.सुंदरबाई वाहुळकर, मजदूर युनियनच्या कॉ.प्रयागबाई लोखंडे आदींची उपस्थिती होती.

त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

कॉ.उज्वला पडलवार,नांदेड.

राज्य सचिव : सीटू  संघटना महाराष्ट्र राज्य.


Breaking News

कॉम्रेड यादवराव गायकवाड यांना स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन!*