Ticker

6/recent/ticker-posts

अध्यक्ष महाराष्ट्र ग्रामीण बँक मिलिंद घारड सर यांचे प्रतिपादन राष्ट्रीय महामार्गावरील टी पॉईंट येथे हाजी कॉम्प्लेक्स मध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे स्थलांतर



शेतकरी आणि मागासलेल्यांच्या विकासास प्रधान्य

श्रीक्षेत्र माहूर 

महाराष्ट्रातील शेतकरी आणि आर्थिक दुर्बल घटकात मोडत असलेल्या मागास प्रवर्गाच्या विकासासाठी बँक सदैव प्रयत्नशील असून त्यांच्या विकासास प्रथम प्राधान्य देण्यात येत असल्याने महाराष्ट्रात महाराष्ट्र ग्रामीण बँक ही नागरिकांच्या प्रथम पसंतीस उतरली असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड यांनी शाखा स्थलांतर कार्यक्रमाच्या वेळी केले


शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे स्थलांतर राष्ट्रीय महामार्गावरील टि पॉइंट जवळ असलेल्या हाजी कॉम्प्लेक्स च्या भव्य इमारतीत करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड होते तर प्रमुख उपस्थितात 

नरेंद्र खत्री क्षेत्रीय व्यवस्थापक नांदेड ,नायब तहसीलदार निलेश राऊत पुरवठा निरीक्षक गजेंद्र मिरजगावे अमोल अलकरी शाखा व्यवस्थापक,असिस्टंट जनरल मॅनेजर संतोष प्रभावती, माजी शाखा व्यवस्थापक दीपंकर पाटील वाई बाजार येथील शाखा व्यवस्थापक रोशन पेंदोर  श्री रेणुका देवी संस्थानचे विश्वस्त चद्रकांत भोपी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सरफराज दोसानी जागा मालक हाजी हाशम शकूर मकराणी किशोर जगत आरिफ शेठ  सूर्रेय्या किसन राठोड  इर्शाद मकरानी कमलेश कुमरे विपीन गरमले प्रतीक्षा तमगाडगे भाऊ पाटील मनीष टोपरकवार आफताब मकरानी सुनील गोविंदवार नामदेव कातले तौफिक मकरानी श्री सुर्वे पत्रकार पंडित धुपे जयकुमार अडकिने इलियास बावाणी यांचे सह बँकांचे कर्मचारी प्रतिष्ठित नागरिक ग्राहक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते 



यावेळी मिलिंद घारड यांनी पुढे बोलताना सांगितले की संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 750 शाखा आपली बँकिंग सेवा देत आहे 117 कोटी रुपयांचा टर्न ओव्हर बँकेचा असून ग्राहकांच्या विश्वासावर ही बँक चालत असून ग्राहकांना सुविधा देताना जलद प्रक्रियेचा अवलंब होत असल्याने नागरिकांचा बँकिंग व्यवहारात वेळ वाया जात नसल्याने महाराष्ट्र ग्रामीण बँक ग्राहकाच्या प्रथम पसंतीस उतरली आहे असे सांगितले यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून बँकेच्या नवीन वास्तू स्थलांतर कार्यक्रम आणि बँकेच्या भरभराटीसाठी शुभेच्छा दिल्या

Breaking News

आदिलाबाद परळी रेल्वे  मधून अवैधरित्या सागी माल वाहतूक करताना तपासणी अंती जप्त