Ticker

6/recent/ticker-posts

शंभर महिलांच्या ग्रुप द्वारे पंढरपुरात स्वच्छता अभियान


 माहूर 

माहूर तालुक्यातील मौजे लखमापूर येथील दीक्षित परिवारासह  मंडळातील बाहेरगावच्या शंभर महिला कडून पंढरपुरात प्रदक्षिणा मार्गावर सतत स्वच्छता अभियान सुरू असल्याने  स्वच्छता अभियानासाठी पुढाकार घेऊन दीक्षित परिवाराकडून संत महंतांच्या संगतीत  स्वच्छता अभियान होत असल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे


 अजय शिवराज सिंह दीक्षित व त्यांच्या पत्नी सौ नमिता अजय सिंह दीक्षित सोबतच महागाव तालुक्यातील काळी टेंभी येथील  कुलदीप राऊत व त्यांच्या पत्नी सौ रुपाली राऊत हे ही सोबत होते


व्यसन मुक्ती सम्राट महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त ह.भ.प.रामेश्वर महाराज खोडे ह.भ.प.पवन महाराज खोडे   यांच्या उपस्थितीत तसेच मनोरा तालुक्यातील भुली येथील १०० महिला  सौ.छायाताई डहाके यांच्या अध्क्षतेखाली पांडुरंगाच्या दरबारात ग्राम स्वच्छते करित होत्या ही स्वच्छता दिंडी माहुर येथून निघून संपूर्ण प्रदिक्षणा मार्ग स्वच्छ केला श्री क्षेत्र माहूरगडचा खराटा पांडुरंगाचा दरबार स्वछ करतांना पाहून वारकरी समाधान व्यक्त करत होते

Breaking News

आदिलाबाद परळी रेल्वे  मधून अवैधरित्या सागी माल वाहतूक करताना तपासणी अंती जप्त