किनवट तालुक्यात दोन ते तीन तासात अति मुसळधार पाणी पडल्यामुळे किनवट शहरातील सकल भागातील फ्लड झोन एरियामध्ये पैनगंगा नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने शहरातील गंगानगर, गजानन महाराज एरिया, मोमीनपुरा भागात पाणी शिरल्याने नागरिकांच्या मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे.
सर्व पूरबाधित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. किनवट स्थित असलेल्या साईबाबा मंदिर परिसरातील कृष्णप्रिय गोशाळेतील किती गुरेढोरे पावसात वाहून गेली. याचा आगळा अजून पुढे आलेला नाही. तर अनेक गुराढोरांना गोरक्षकांनी आपल्या जीव धोक्यात घालून पुरातून बाहेर काढलं आहे. त्यामुळे अनेक मुक्या प्राण्यांना जीवनदान मिळाली आहे. सकल भागातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे दुकानाच्या सामानाची नासधूस झाली आहे. तर शेकडो घरात पाणी शिरल्याने घरातील जीवन आवश्यक वस्तूंचे अतोनात नुकसान झाले आहे.
अनेक घरांची पडझड झाली आहे. किनवट प्रशासन या सर्व बाबीकडे लक्ष देऊन आहे. किनवट नगरपालिकेचे कर्मचारी, तहसीलदार व महसूल प्रशासन सदरील कामात व्यस्त आहेत. किनवटचे आमदार भीमराव केराम हे ही सर्व परिस्थितीकडे बारकाईने लक्ष देऊन आहेत. प्रशासनाला तशा त्यांनी सूचनाही केल्या आहेत. किनवटचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या सुविध्य पत्नी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या बेबीताई प्रदीप नाईक यांनी तहसीलदार चौंडीकर फोनवरून पुरात अडकलेल्या सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी नेऊन त्यांना प्रशासनातर्फे योग्य तोपरी मदत करण्याच्या सूचना केल्या आहेत.
किनवट तालुक्यात रात्रीपासूनच पाण्याची रिपरिप सुरू होती परंतु सकाळच्या मुसळधार पाण्याने किनवटचे जीवन जनजीवन विस्कळीत झाले आहे. किनवटच्या तसेच गोकुंद्याच्या रस्त्यावर पाणीच पाणी दिसून येत होते. बोधडी ते सिंदगी दरम्यान एक स्कूल बस वाहून गेल्याची बातमी आहे यात वाहन चालक अद्यापही मिळाला नसल्याचे बोलल्या जात आहे. किनवट तालुक्यातील सर्वच सज्जामध्ये पुराचे पाणी व अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.
अनेक शेतीमधील उभी पिके खरडून वाहून गेल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब शासनाची मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून पुढे येऊ लागली आहे.
शहरातील सखल भागांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे अनेकांची घरे उघड्यावर पडली आहेत. त्यामुळे झालेल्या नुकसानीची ताबडतोब पंचनामे करून शासनामार्फत मदत मिळावी अशी मागणी येथील सकल भागातील नागरिकांनी आमच्याजवळ बोलून दाखवली. प्रशासन या सर्व बाबीकडे लक्ष देऊन आहे प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार चौंडेकर मॅडम यांनी केली आहे.
नांदेड जिल्ह्यात आगामी काही तासासाठी रेड अलर्ट चा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आपत्ती निवारणासाठी सज्ज असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक यांच्यासह इतर यंत्रणाच्या अधिकाऱ्यांना मुख्यालय राहण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. कोणतेही परिस्थितीत उद्भवल्यास त्या परिस्थितीत नागरिकांना मदत मिळावी या अनुषंगाने प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील काही भागात पाणी शिरल्याने तेथील काही कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.