कामगारांना लुटणाऱ्या दलालांचा समाचार घेणार
श्रीक्षेत्र माहूर| तालुक्यात दलाला मार्फत बोगस बांधकाम व इतर कामगारांची बनावट कागदपत्रा च्या आधारे नोंदणी होत असल्याने मूळ कामगार लाभापासून वंचित राहत असून खऱ्या कामगारांना साहित्य मिळवून देतो तुमचा अर्ज भरून देतो म्हणून हजारो रुपयांची लूट होत असून ही लूट थांबवून खऱ्या कामगारांना न्याय मिळावा आणि दलाला पासून सुटका व्हावी यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांनी मौजे पाचुंदा येथे बैठक घेऊन गोरगरीब कामगारांना लुटणाऱ्या दलालांचा समाचार घेऊ आणि खऱ्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाभरात बैठका घेऊन कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मौजे पाचुंदा येथे झालेल्या बैठकीत कामगारांना दिले
माहूर तालुक्यातील प्रभू श्रीराम मंदिर पाचुंदा येथे झालेल्या बैठकीत मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांनी बांधकाम कामगाराच्या समस्या जाणून घेतल्या बैठकीला शेकडो बांधकाम व इतर कामगार बांधकाम कामगार उपस्थित होते कामगार कार्यालयाकडून दलाला मार्फत आर्थिक देवाणघेवाणीतून बोगस मजुरांची नोंदणी केली जात असल्यामुळे मूळ बांधकाम कामगार व इतर कामगारांच्या अधिकार व शासकीय व शैक्षणिक लाभांपासून वंचित असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व कामगार कल्याण उपायुक्त अनिकेत थोरात साहेबांसोबत चर्चा करून खरे वंचित बांधकाम व इतर कामगारांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन देऊन मनसे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांनी कामगाराच्या समस्येसाठी मी खंबीरपणे आपल्या पाठीशी उभा आहे कुठलीही अडचण असल्यास मी तुमच्यासोबत आहे असे सांगून कामगारांना बैठकीदरम्यान धीर देऊन नोंदणी करून देण्याची हमी दिली
यावेळी माहूर तालुक्याचे कामगार संघटनेचे प्रमुख निळकंठ डालके, चंद्रकांत आढागळे, पंजाब वाठोरे, आकाश मोरे,गणेश साळुंके, विनोद राठोड, गणपत पारडे तसेच मनसेचे पदाधिकाऱ्यांची उपस्थित मान्यवर गावाचे पोलीस पाटील व कार्यक्रमाचे अध्यक्ष सह मनसेचे शेतकरी सेना तालुका अध्यक्ष राजू पवार, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष रवि शेंडे, अनुराग पाटील,अर्जुन,अशील चव्हाण, इतर मनसे सैनिक उपस्थित होते.
