संतोष गंधे यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार मिळाल्याने गोंडवाडी गावात उत्साहाचे वातावरण
श्रीक्षेत्र माहूर
हा पुरस्कार माझा नसून संपूर्ण गावाचा आहे.” गंधे सरांनी सांगितले
माहूर तालुक्यातील गोंडवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक संतोष शेषराव गंधे यांना शैक्षणिक क्षेत्रातील महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार मिळाल्याने गोंडवाडी गावाचे समस्त गावकरी व शालेय व्यवस्थापन समिती यांनी सत्कार सोहळा आयोजित करून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकी द्वारे गावात हृदय सत्कार केला
परिश्रमांवर विश्वास आणि विद्यार्थ्यांवर प्रेम यामुळेच संतोष गंधे सरांचा प्रवास आज राज्यपातळीवर दखलपात्र ठरल्याने त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला त्यामुळे गोंडवाडी गावासह माहूर तालुका शिक्षण विभागाचेही नाव उज्वल झाले. यावेळी प्रकाश बावणे वाघमारे सर संदिप तोडसाम संजय सिद्धेवार रूपाली बावणे विष्णु बावणे विमलबाई पुरके विनोद बावणे निलेश कातले राजु मेश्राम जंगोबाई तोडसाम अनुपमा मेश्राम मनोज मेश्राम कल्पना पुरके लैलाबाई तोडसाम मिनाबाई मेश्राम अश्विनी कातले दिपाली बावणे यांचे सह गावकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
