किनवट (प्रतिनिधी)
किनवट तालुक्यातील जिपप्रा शाळा,पितांबरवाडी येथे कार्यरत असलेले मारोती देवराव भोसले यांची ग्रामविकास मंत्रालयाद्वारे ऑनलाईन पार पडलेल्या जिल्हाअंतर्गत बदली मध्ये किनवट तालुक्यातून मुखेड तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा मांजरी या शाळेवर बदली झाली आहे. त्यांचा प्राथमिक शिक्षकाचा प्रवास हा जिल्हा परिषद रायगड येथून 2011 मध्ये सुरुवात झाला होता. त्यानंतर ते आंतरजिल्हा बदलीने 13/11/2020 रोजी जिल्हा परिषद नांदेड येथे हजर होऊन त्यांना किनवट तालुक्यातील आदिवासीबहुल भाग पितांबरवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये नियुक्ती देण्यात आली. शाळेतील कमी पटसंख्या अभावी त्यांनी प्रतिनियुक्तीने जिप उच्च प्रा.शाळा राजगडतांडा, राजगडगाव,मलकवाडी माळबोरगाव तसेच जिल्हा परिषद हायस्कूल (मुलींचे)किनवट येथे ज्ञानदानाचे कार्य पार पाडले राजगडतांडा या शाळेवर असताना त्यांनी इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांची नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेची उत्तम तयारी करून घेऊन शाळेतील 10 विद्यार्थी शिष्यवृत्तीपात्र व दोन विद्यार्थी हे
शिष्यवृत्तीधारक झाले होते त्याचबरोबर नवोदयसाठी सुद्धा त्यांनी खूप छान अध्ययन अध्यापन केले होते. शैक्षणिक क्षेत्रामध्येच त्यांनी त्यांच्या रंगकर्मी साहित्य,कला,क्रीडा प्रतिष्ठान उदगीर जि.लातूर यांच्या वतीने किनवट-माहूर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय रंगभरण,चित्रकला व निबंध स्पर्धेचे मोठ्या स्तरावर आयोजन करून येथे स्थानिक विद्यार्थ्यांना किनवट-माहूर तालुक्याचे आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते बक्षीस वितरण केले होते.त्यांचबरोबर तालुक्यात प्रथमच राज्यस्तरीय मंथन सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन केले होते. क्रीडा क्षेत्रात सुद्धा राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे किनवट मध्ये दोन वेळा आयोजन मध्ये केले होते. याच त्यांच्या कार्याचा गुणगौरव म्हणून किनवट-माहूर तालुक्याचे आमदार भीमराव केराम, तत्कालीन डीवायएसपी, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी यांचा सपत्नीक सत्कार सुद्धा केला होता.अल्पावधीत त्यांनी किनवट तालुक्यातील शैक्षणिक,सामाजिक,क्रीडा,
उद्योजक तसेंच राजकीय क्षेत्रात त्यांनी चांगली ओळख आणि प्रतिष्ठा निर्माण केली होती.शिक्षक संघटनेत सुद्धा त्यांचे वक्तृत्व नेतृत्व उत्तम होते किनवट तालुक्यात त्यांचा भरपूर असा मित्रपरिवार होता अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची बदली झाल्यामुळे तालुक्याच्या वतीने त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी बॅडमिंटन ग्रुप किनवट यांनी भावनिक वातावरणात निरोप देण्यात आला.

