Ticker

6/recent/ticker-posts

सचिव रविंद्र राठोड यांचेवर शिस्तभंगाची कार्यवाही करा - संचालक नविन राठोड

 


किनवट = (ता.प्र.) किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रविंद्र राठोड यांच्याविरुद्ध अनियमितता व नियमभंगागाबाबत शिस्तभंगाची कार्यवाही करावी. अशी तक्रार बाजार समितीचे संचालक नविन राठोड यांनी पणण मंत्र्यांकडे केली असुन त्यात त्यांनी असे नमुद केले आहे की, ह्या सचिवांनी मागील सहा महीन्याच्या कालावधीत एकही सभा आयोजित करण्यात आली नाही. ही बाब नियमबाह्य असुन प्रशासनातील गंभीर त्रुटी दर्शविते. शासकीय नियमांचे उल्लेघन करणे. आर्थिक पार्दशतेचा अभाव असल्याने सचिवाविरुध्द  शिस्तभंगाची कार्यवाही करावी. असेही संचालक नविन राठोड यांनी या निवेदनात नमूद केले आहे.

१५ दिवसापासून सचिवांचा फोन बंद, तीन महिन्यापासून शेतकऱ्यांची देयके थकवली!


आर्थीक दृष्ट्या डबघाईला आलेल्या किनवट कृषीउत्पन्न बाजार समीतीच्या कर्मचाऱ्याना मागील पाच वर्षा पासून पगार मिळाला नाही येथील कारभार सलाइन वर सुरु असतानाच किनवटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन खरेदी प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नाफेडमार्फत १३ जानेवारी २०२६ रोजी खरेदी करण्यात आलेल्या सोयाबीनचा मोबदला अजूनही शेतकऱ्यांना न मिळाल्याने नाराजी वाढू लागली आहे. तीन महिने उलटूनही 'आज-उद्याच्या आश्वासनांपलीकडे काहीच होत नसून

कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या सचीवाने भ्रमणध्वणी बंद करुन ठेवला आठ पैकी दोनच कर्मचारी त्यात ही एक शिपायी असल्याने सर्व कामकाज ठप्प असुन दोघेजन मार्केट कमेटीचे कार्यालय सांभाळत बसल्याचे वास्तव समोर आल्याने सोयाबीन बीकून हातबल झालेल्या शेतकऱ्यानी न्याय कुणाला मागावा हा प्रश्न ऐरणीवर आला. २०१ शेतकऱ्यानी कृषी उत्पन्न बाजार समीती सोयाबीन टाकले पण यात ३२ शेतकन्याच्चा मालात तफावत आढळुन आली, बेल्लोरी येथील सौ. सुषमा आयलेनीवार यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी यासंदर्भात सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून, नियमानुसार शेतकन्यांना आठ ते पंधरा दिवसांत खरेदी केलेल्या  मालाचा मोबदला मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना वारंवार बाजार समितीच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. सचिवांचा भ्रमणध्वनी बंद असून संपर्क होत नसल्याने शंका अधिकच पक्की होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावारंवार फेऱ्या मारून कंटाळलेल्या एका शेतकऱ्याने 'कारभार पाहणारेच गायब, मग जबाबदारी कोणाची?' असा संत्पत सवाल उपस्थित केला आहे. तक्रारीनुसार, सुमारे २०१ शेतकऱ्यांचा सोयाबीन माल खरेदी करण्यात आला. 



त्यापैकी ३२ शेतकऱ्यांच्या मालाबाबत तफावत असल्याचा संशय व्यक्त होत आहे वखार महामंडळातील पडताळणीत काही तक्रारदारांची नावे नोंदीत आढळून न आल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे खरेदी प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. दरम्यान, बाजार समिती कार्यालयातील कारभाराबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. कार्यालयात कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती आणि उपस्थित असणाऱ्यांची बेजबाबदार व शंकास्पद उत्तरे यामुळे शेतकऱ्यांना ठोस माहिती मिळत नसल्याचे दिसून येत असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे परिस्थिती आणखी चिघळत असल्याचा आरोप होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समीतीने आमचे सोयाबीन

नाफेड ऐवजी खाजगी व्यापाऱ्याला विकले पण आमचे चुकारे दिले नसल्याने आमची फसवणुक झाल्याचा आरोप ही शेतकऱ्यांनी केली दरम्यान आगामी पेरणी हंगाम जवळ येत असताना मोबदला न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. 'माल विकलेल्या, पावत्या हातात आहेत; पण पैसा कधी मिळणार? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्रित करावी, दोषीवर कठोर कारवाई करावी व शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला व्याजासह तात्काळ मिळवून द्यावा, या गंभीर प्रकाराबाबत संचालक मंडळ चुकारे न मिळालेल्या शेतकऱ्यांना कसा अन कधी न्याय देणार, या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर काय कार्यवाही करणार याकडे बळीराजाचे लक्ष लागून आहे. दि. २५ मार्च रोजी सायंकाळी प्रशासकीय अधिकारी व शेतकऱ्यांनी येथील गोडाऊनला कुलूप लावण्यात आली आहेत.

Breaking News

सचिव रविंद्र राठोड यांचेवर शिस्तभंगाची कार्यवाही करा - संचालक नविन राठोड