Ticker

6/recent/ticker-posts

किनवट नगर परिषदेत ‘नमो उद्यान’ विकास कामाचे भूमिपूजन संपन्न*


किनवट (प्रतिनिधी) : किनवट नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्र. ०३ बेल्लोरी येथील नगरपरिषद मालकीच्या खुल्या जागेत ‘नमो उद्यान’ विकसित करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा सोहळा किनवट नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद येंड्रलवार यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.


सदर उद्यान विकास काम हे वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी अनुदान योजना सन २०२४-२५ अंतर्गत मंजूर करण्यात आले असून या कामासाठी एकूण १ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. नगर परिषद बांधकाम विभागाच्या कार्यादेश क्रमांक बांधकाम विभाग/५४४/२०२६, दिनांक ०९ मार्च २०२६ नुसार या कामास अधिकृत सुरुवात करण्यात आली आहे. काम पूर्ण करण्यासाठी ३६५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.


या प्रकल्पाचे कंत्राट दिनेश कन्स्ट्रक्शन कंपनी, नांदेड (प्रो. प्रा. किरण दिनेश देशमुख) यांना देण्यात आले असून नियोजित वेळेत दर्जेदार काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ‘नमो उद्यान’ विकसित झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना विरंगुळा, व्यायाम तसेच पर्यावरणपूरक वातावरण उपलब्ध होणार असून शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.


या भूमिपूजन प्रसंगी नगराध्यक्षा सौ. सुजाता येंड्रलवार यांच्यासह नगरसेवक चंद्रशेखर रंगराव नेम्मानिवार, उपाध्यक्ष श्री. मोहम्मद हसनखान म. नुरखान पठाण, मुख्याधिकारी श्री. मुगाजी काकडे तसेच इतर मान्यवर व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी या प्रकल्पामुळे शहराच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे मत व्यक्त केले तसेच काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदाराला देण्यात आल्या.


या भूमिपूजन सोहळ्याला नगराध्यक्षा सुजाता येंड्रलवार यांच्यासह नगरसेविका ललिता मारोती मुनेश्वर, नगरसेवक चंद्रशेखर रंगराव नेम्मानिवार, माजी उपाध्यक्ष अभय महाजन, सभापती श्रीराम नेम्मानिवार, सामाजिक कार्यकर्ते मुकेश नेम्मानिवार, मारोती मुनेश्वर, इम्रान शेख चांद, अन्वर मिर्झा, शहबाज खान पठाण, शेख अली, आरिफ भाटी, प्रभु कोल्हे, मिना नेम्मानिवार, निरजा नेम्मानिवार, मनिष ताडपेल्लीवार, संतोष बंडीवार, रोहन पिसारीवार यांच्यासह अनेक मान्यवर व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी संबंधित कंत्राटदारास काम दर्जेदार पद्धतीने व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच प्रकल्पाची नियमित पाहणी करून गुणवत्तेवर विशेष लक्ष देण्याचे निर्देशही प्रशासनाकडून देण्यात आले.

Breaking News

डीजे वाजविल्यास जप्तीसह गुन्हे दाखल करणार     अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांचा शांतता समितीच्या बैठकीत इशारा