श्रीक्षेत्र माहूर
पवित्र श्रीराम नवमी तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त माहूरच्या पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी शांतता समितीचे सदस्य तसेच उपस्थित जयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांना डीजे वाजविल्यास डीजे जप्त करून गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा देऊन डीजे वाजवू नका असे आवाहन केले
माहूर शहरासह तालुका भरात श्रीराम नवमी सह डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो ठीक ठिकाणी अभिवादन मिरवणुका काढल्या जातात बैठकीत अनेक वर्षापासून डीजे वाजवू नका असे आवाहन पोलीस विभागामार्फत करण्यात येते तसे शासनासह न्यायालयाचे आदेश सुद्धा आहेत परंतु अनेक मिरवणुका डीजे वाजविला जातो त्यामुळे श्रीमती अर्चना पाटील यांनी धार्मिक उत्सव मिरवणुकीत महिलांनी बालकांनी सहभाग घ्यावा यासाठी कुठलेही त्रासदायक काम नको याची काळजी घेण्याचे आवाहन केले
यावेळी शांतता बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील पोलीस निरीक्षक देविदास चोपडे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके पत्रकार सौ सुरेखा तळणकर ज्येष्ठ पत्रकार विजय आमले वसंत कपाटे नंदकुमार जोशी राज ठाकूर नगरसेवक गोपू महामुने मनोज कीर्तने मेघराज जाधव आकाश कांबळे अपील बेलखोडे निसार कुरेशी रावजी राठोड कैलास फड यांचे सह कार्यकर्ते पोलीस बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते
