Ticker

6/recent/ticker-posts

धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांचा बहुचर्चित असलेल्या 'कायापालट' उपक्रमाने आपला ५८ वा महिना यशस्वीरित्या पार पाडला

नांदेड, प्रतिनिधी: समाजातील उपेक्षित, बेघर, अपंग व मानसिक अस्थिर नागरिकांच्या सन्मान आणि सशक्तीकरणासाठी धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांचा बहुचर्चित असलेल्या 'कायापालट' उपक्रमाने आपला ५८ वा महिना यशस्वीरित्या पार पाडला. या महिन्यात तब्बल ५६ नागरिकांचा संपूर्ण कायापालट करण्यात आला असून आता पर्यंत तीन हजाराच्या भ्रमिसष्ठाना फायदा झाला , ज्यात दाढी-केस कापणे, अभ्यंगस्नान, स्वच्छ व नविन कपड्यांचे वाटप अशा विविध गोष्टींचा समावेश होता.

------------------------
उपेक्षितांच्या आयुष्याला नवीन श्वास:अॅड. दागडिया 

“कायापालट हा उपक्रम म्हणजे केवळ स्वच्छतेचा कार्यक्रम नाही, तर उपेक्षितांच्या आयुष्याला दिला जाणारा नवीन श्वास आहे. अॅड. दिलीप ठाकूर यांची 
ही जगावेगळी समाजसेवा असून, यातून माणुसकीचे खरे दर्शन घडते. समाजाने या कार्यात पुढाकार घ्यावा, ही वेळेची गरज आहे. 
---------------------------

सोमवारी सकाळी ६ वाजता कामाजी सरोदे, सुरेश शर्मा, शिवा लोट, संजयकुमार गायकवाड व प्रभुदास वाडेकर यांनी शहरातील विविध भागांतून या नागरिकांना आणले. स्वयंसेवक राजूअण्णा व प्रसाद पस्पुनूर यांच्या कुशलतेने सर्वांची दाढी आणि केसांची स्वच्छता करण्यात आली.भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांच्या मदतीने अंघोळीची व्यवस्था करण्यात आली. विलास जोगदंड यांनी अत्यंत प्रेमाने प्रत्येकाला साबण लावून अभ्यंगस्नान घातले. त्यानंतर जेष्ठ समाजसेविका स्नेहलता जायस्वाल, गिता परिवारच्या अध्यक्षा निता दागडिया, व प्रतिष्ठित उद्योजक सुहास पळशीकर यांच्या हस्ते अंडरपॅन्ट, बनियन, पँट व टी-शर्टचे वाटप करण्यात आले. कायापालटनंतर बदललेले तेजस्वी चेहरे पाहून अनेकांच्या डोळ्यांत समाधानाचे अश्रू दाटून आले.

नेहमीप्रमाणे सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला चहा, फराळ आणि १०० रुपयांचे बक्षीस देण्यात आले. डॉ. दि.बा. जोशी व डॉ. अर्जुन मापारे यांनी सर्वांची वैद्यकीय तपासणी करून जखमांवर मलमपट्टी केली व मोफत औषधे दिली.कार्यक्रमानंतर स्वच्छता दूत अॅड. चिरंजीलाल दागडिया यांच्या पुढाकारातून गोवर्धन घाट परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

या यशस्वी आयोजनासाठी भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, अमरनाथ यात्री संघ व सन्मित्र फाउंडेशन यांचे मोलाचे योगदान लाभले. कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, संघटन मंत्री संजय कोडगे, भाजपा अध्यक्ष अमरनाथ राजुरकर, जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, ॲड. किशोर देशमुख, लायन्स उपप्रांतपाल योगेश जयस्वाल व अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

पुढील महिन्यातील 'कायापालट' उपक्रमासाठी कोणतीही उपेक्षित व्यक्ती माहितीमध्ये असेल, तर ती जूनच्या पहिल्या रविवारी कळवावी, असे आवाहन धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे.

Breaking News

कॉम्रेड यादवराव गायकवाड यांना स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन!*